
Independence Day 2024 Quiz
भारताचा राष्ट्रध्वज, तिरंगा, हा आपल्या देशाचा अभिमान आणि एकता दर्शवणारा प्रतीक आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण तिरंग्याविषयी काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.
Independence Day 2024 Quiz: अगदी शाळेत असल्यापासून आपण प्रत्येकवर्षी भारताच्या स्वातंत्र्य दिनासंदर्भातील अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला खरंच स्वातंत्र्यदिनासंदर्भात आणि तिरंग्याबद्दल किती गोष्टी ठाऊक आहेत? हे जाणून घेण्यासाठी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त खास तिरंगा क्विझ आणलं आहे. पटकन हे क्विझ सोडवा आणि स्वातंत्र्य दिन आणि भारताच्या तिरंग्यासंदर्भात तुम्हाला किती माहिती आहे हे जाणून घ्या.
स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा क्विझ
Results
#1. १५ ऑगस्ट १९४७ रोजी कोणता वार होता?
#2. भारतीय तिरंग्याचा शोध कोणी लावला?
#3. इन्कलाब झिंदाबाद” ही घोषणा सर्वप्रथम कोणी दिली?
#4. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या अधिवेशनात ‘पूर्ण स्वराज’ घोषित केले?
#5. स्वातंत्र्यपूर्व भारतात पहिला तिरंगा ध्वज कोणी फडकवला?
#6. भारताचा ध्वज किती वेळा बदलला आहे?
#7. १९४७ च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने निर्माण झालेले दुसरे स्वतंत्र राष्ट्र कोणते होते?
#8. १५ ऑगस्ट रोजी भारताव्यतिरिक्त या देशाचाही स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो?
#9. ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक कोणत्या स्वातंत्र्यसैनिकाने लिहिले आहे?
#10. भारतीय तिरंग्यातील कोणता रंग समृद्धीचे प्रतीक आहे?
भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या जीवाची बाजी लावली. अगदी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते जवाहरलाल नेहरू, भगतसिंग, सरोजिनी नायडू यांच्यापर्यंत अनेकांनी आपले आयुष्य पणाला लावले. दुःखाच्या अनेक झळा सोसल्यानंतर अखेर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.