वार्ताहर : संतोष शिंदे . मुंबई -कलिना सांताक्रूज येथील एअर इंडिया वसाहतींमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातील बेकायदेशीर कपातीच्या निषेधार्थ एअर इंडिया कॉलनी बचाव समितीच्यावतीने जुन्या एअर इंडिया कॉलनी पूर्वेकडील मुख्य
गेटवर (आज) जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले .या धरणे आंदोलनात एअर इंडिया कॉलनीतील सर्व रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या धरणे आंदोलनात एअर इंडिया प्रशासनाचा जोरदार निषेध करण्यात आला.
एअर इंडिया कॉलनी बचाव समितीने मुंबईतील एअर इंडिया वसाहतींमध्ये
राहणाऱ्या एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना जारी केलेल्या निष्कासनाच्या
नोटिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यासह विविध
पावले उचलली आहेत.
👍 हे पण वाचा 👇👇
🤩 खुशखबर !!!!!!!
विमानात बसायचय फक्त 1700 रुपयांमध्ये करा✈️ विमान प्रवास‼️
या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे .पुढील सुनावणी बुधवार दि नांक 25 जानेवारी रोजी आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असे असताना देखील एअर इंडिया व्यवस्थापनाने न्यायालयीन कार्यवाहीचे पूर्णपणे उल्लंघन करून कर्मचाऱ्यांच्या पगारातुम दंडात्मक भाड्याची
कपात सुरू केली आहे. त्यामुळे एअर इंडिया कर्मचाऱ्यांमध्ये एअर इंडिया व्यवस्थापना विरोधात संतापाची भावना निर्माण झाली आहे .
व्हाटसअँप वर मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट. आत्ताच जॉईन करा.