IMD Alert | सावधान! पुढचे पाच दिवस होणार ऊन पावसाचा खेळ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस लावणार हजेरी

सावधान! राज्यात ‘ऑरेंज’ आणि ‘यलो अलर्ट’, पुढील पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा; विदर्भातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस भारतीय हवामान खात्याने पुढील पाच दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज आणि यलो अलर्ट) जारी केला आहे.

कोकणाबरोबरच विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रालाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाने जोरदार तडाखा दिला आहे.

आता पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज आणि यलो अलर्ट) जारी केला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्हे.

मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजी नगर, लातूर, जालना, बीडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, नांदेड, लातूर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार शहरांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना २९ एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर वगळता सर्व जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, विदर्भ आणि छत्रपती संभाजी नगर यांना पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात ३० एप्रिल रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

1 मे रोजी विदर्भ, मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणाशिवाय इतर जिल्ह्यांमध्येही अवकाळी पावसाची शक्यता असून विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी 2 मे रोजी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे ही वाचा : ग्रीन अलर्ट, येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट अन् रेड ‘या’ अलर्टचा अर्थ काय होतो? जाणून घ्या.


tc
x