कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी वारंवार पत्रे देऊन आंदोलनेही करण्यात आली. आता तर शिक्षकांनि उत्तर पत्रिका तपासणी वर बहिष्कार टाकला आहे
हे ही वाचा :- १० वी आणि १२ वीच्या पेपरसाठी १० मिनिटे वाढीव वेळ…पण कधी आणि कोणाला?
चंद्रपूर : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या बहुसंख्य मागण्या वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. शासनाकडून मागण्यांवर केवळ आश्वासनेच देण्यात आली आहे, प्रत्यक्ष कोणतीच अंमलबजावणी नाही. यामुळे संतप्त उच्च माध्यमिक शिक्षकांनी इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा :- बोर्डाच्या परीक्षेची तयारी करताय? मग ‘हे’ Apps करतील तुमची मदत आजच डाउनलोड करा
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्यांच्या निराकरणासाठी वारंवार पत्रे देऊन आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाकडून काही दाद मिळाली नाही. शासनस्तरावर काही बैठका झाल्या होत्या. त्यात काही मागण्या मान्य ही करण्यात आल्या होत्या. मात्र त्याबाबतचे आदेश अद्यापही निघालेले नाहीत.