Heatstroke : उष्माघात वाढतोय, उष्माघाताची लक्षणे,बचाव कसा करावा

Heatstroke : उष्माघात वाढतोय काळजी घ्या – – – –

शरीरातील पाणी वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.

गर्मीचा कहर वाढत आहे आणि त्यासोबतच उष्माघाताच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि त्यामुळे उष्माघात होतो. उष्माघात हा एक गंभीर आजार आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यास मृत्यू देखील होऊ शकतो.

उष्माघाताची लक्षणे:

  • तीव्र तहान
  • डोकेदुखी
  • चक्कर येणे
  • मळमळ आणि उलट्या
  • थकवा
  • अशक्तपणा
  • त्वचेचा रंग फिकट पडणे
  • श्वास घेण्यास त्रास
  • स्नायूंमध्ये ऐंठण

उष्माघातापासून बचाव कसा करावा:

उपाय –

१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.

२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.

३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.

४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.

५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.

६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.

७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.

८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.

९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.

>>>>येथे क्लिक करा <<<

tc
x