X

Heart attack symptoms : तीन रुपयांची गोळी हृदयविकाराचा झटका टाळते; छातीत चावी मिळाल्यानंतर चार तासात…

Heart attack symptoms

Heart attack symptoms : एस्पिरिन गोळीच्या सेवनाने हार्ट अटॅकला रोखता येऊ शकतो. यासंदर्भात अनेकदा बोलले आणि लिहीले गेले आहे. छातीत अचानक खूपच दुखत असेल आणि अस्वस्थ वाटत असेल तर चार तासांच्या आत एस्पिरिनची गोळी घ्यावी. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ प्राण वाचू शकतात यावर जर्नल ऑफ अमेरिकन हार्ट असोसिएशनने केलेल्या अभ्यासात पुन्हा एकदा संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

एस्पिरिन गोळी तूम्ही अत्यंत सावधानता पूर्वक घेतली पाहीजे. जेव्हा रुग्णाला खूप जोराने छातीत काही तरी तुटल्यासारखे दुखत असेल आणि घाम आला असेल तसेच चक्कर येत असेल तर अशावेळी 325 एमजीची एस्पिरिनच्या तीन गोळ्या क्रशकरून लागलीच खाऊ शकता. त्याशिवाय तुम्ही अतिरिक्त 5 एमजी सोरबिट्रेट देखील जिभेखाली ठेवू शकता त्यामुळे छातीत कळा कमी होतील.

या लक्षणावेळी गोळी खावी

  • आपल्याला छातीत कळा येऊन अस्वस्थ वाटत असेल.
  • बाहूंमध्ये, मान आणि जबड्यात वात आला असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, घाम आला असेल आणि चक्कर येत असेल तर ही हार्ट एटॅकची संभाव्य लक्षणे असल्याने अशा लक्षणावेळी एस्पिरिन गोळी खाण्याचा सल्ला दिला जातो.
  • एस्पिरिनची गोळी रक्त पातळ करण्यास आणि रक्ताच्या गाठी बनण्यास प्रतिरोध करते असेही तज्ञांकडून सांगितले जाते.
  • ‘ॲस्पिरिन सायक्लो-ऑक्सिजनेस प्रतिबंधित करून अँटी-प्लेटलेट एजंट म्हणून कार्य करते, ज्यामुळे थ्रोम्बोक्सेन ए 2 चे उत्पादन कमी होते, एक अणू जो प्लेटलेट एकत्रीकरण आणि व्हॅसोकॉन्स्ट्रक्शनला प्रोत्साहन देतो असे धर्मशिला नारायण रुग्णालयाच्या कार्डिओलॉजीचे संचालक आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. समीर कुब्बा यांनी म्हटले आहे.

अल्सर असलेल्या लोकांना सूचना >>येथे क्लिक करा

This post was last modified on %s = human-readable time difference 7:33 am

Categories: आरोग्य
Davandi: