Health Tips: आपल्या आहारात गुळाच्या सेवनाला फार महत्व आहे. वेगवेगळ्या पदार्थांमध्ये गूळ वापरला जातो. बरेच वयोवृद्ध लोक आजही त्यांच्या दिवसाची सुरूवात गूळ-पाणी पिऊन करतात. गुळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, आयर्न, फॉस्फोरस, कॅल्शिअम आणि बरेचसे व्हिटॅमिन्स यात असतात. अनेकदा जेवण केल्यानंतर एक तुकडा गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.
गूळ पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी फार फायदेशीर मानला जातो. रोज जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने पचन तंत्र मजबूत होतं. याने गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या दूर होतात.
इम्यूनिटी वाढते :
जेवण केल्यावर एक तुकडा गूळ खाल्ल्याने एनर्जी मिळते. तसेच याच्या सेवनाने इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीही वाढते. ज्यामुळे अनेक आजार आणि इन्फेक्शनपासून बचाव होतो.
हाडं होतात मजबूत :
जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गुळामध्ये अनेक पोषक तत्व असतात. जसे की, कॅल्शिअम, फॉस्फोरस जे हाडं मजबूत करण्यास मदत करतात.
ब्लड प्रेशर कंट्रोल राहतं :
ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी गूळ रामबाण उपाय मानला जातो. गुळाच्या सेवनाने हाय ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यास मदत मिळते.
वजन होईल कमी :
गुळाच्या नियमित सेवनाने वजन कमी करण्यास मदत मिळते. जेवण केल्यावर गूळ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली होते. ज्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळते.
एनीमियामध्ये फायदेशीर :
गुळाच्या नियमित सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता होत नाही. गुळाचं सेवन एनीमियाच्या रूग्णांसाठी फार फायदेशीर आहे. गुळामध्ये आयर्न आणि फॉस्फोरस असतं ज्यामुळे शरीरात रक्त वाढतं. ज्या लोकांमध्य रक्त कमी आहेत त्यांनी गुळाचं सेवन करावं.
टिप : तुम्हाला काही समस्या असेल तर गुळाचं सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..
हेही वाचा : औषधी वांगं आजीबाईचा बटवा
हेही वाचा : रेल्वेमध्ये होणार मोठी भरती, ३५ हजार रुपयांपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज!!
हेही वाचा : मोठी बातमी ग्रामपंचायतीला बाय-बाय क्लिक करा आणि कागदपत्रे मिळवा.