HDFC : शिक्षणासाठी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी अनके स्वयंसेवी संस्था, व्यक्ती समोर येतात. गरजू विद्यार्थ्यांना या संस्था, व्यक्तींकडून मदत केली जाते. या समाजकार्यात एचडीएफसी बँकही मागे नाही. या बँकेकडून होतकरू विद्यार्थ्यांना साधारण 15 हजार रुपयांपासून 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीच्या रुपात आर्थिक मदत केली जाते.
शिष्यवृत्तीचे स्वरुप काय आहे?
एचडीएफसीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना 15 हजार रुपयांपासून ते 75 हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. एचडीएफसी बँक परिवर्तन एज्युकेशनल क्रायसिस स्कॉलरशीप सपोर्ट (ईसीएसएस) प्रोग्राम असे या शिष्यवृत्तीचे नाव आहे. समाजातील वंचित घटकांना शिक्षण मिळावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती चालू करण्यात आली आहे.
पहिल्या वर्गापासून ते इयत्ता 12 पर्यंत तसेच पदविका, आटटीआय, पॉलिटेक्निक, पदवी, पदव्युत्तर पदवी अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. वैयक्कित तसेच कौटुंबिक अडचणींमुळे शिक्षणाचा खर्च न करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदत दिली जाते. शिक्षणाचा आर्थिक खर्च परवडू न शकणारे विद्यार्थी शिक्षणाच्या साखळीतून बाहेर पडू नये, त्यांनी अर्धवट शिक्षण सोडू नये हा या शिष्यवृत्तीचा मुख्य उद्देश आहे.
शिष्यवृत्तीचा लाभ कोणाला मिळेल? अटी काय?
- भारतीय नागरिकता असणारेच विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
- विद्यार्थी सध्या इयत्ता पहिली ते 12, पदविका, आयटीआय, पदवी, पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमात शिकत असावा.
- विद्यार्थ्याने याआधीच्या इयत्तेत कमीत कमी 55 टक्के गुण मिळवलेले असणे गरजेचे आहे.
- विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
- गेल्या तीन वर्षांपासून जे विद्यार्थी वैयक्तिक तसेच कौटुंबिक पातळीवर अडचणींचा सामना करत आहेत आणि पुढे शिक्षण पूर्ण करू शकणार नाहीत, अशा विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल.
कोणत्या विद्यार्थ्यांना किती शिष्यवृत्ती मिळणार?
This post was last modified on %s = human-readable time difference 9:58 am