सध्या १०० पैकी ७० लोकांना तरी केस गळतीची समस्या भेडसावते आहे. केसांमधून हात फिरवला, कंगवा फिरवला तरी केस हातात येतात, गळतात. केस विंचरताना जमिनीवर अक्षरशः केसांचा सडा पडतो.
म्हणूनच काहीजणांना अकाली टक्कल पडतं, तर महिलांच्या बाबतीत केस विरळ होत जातात. मग अशा लोकांना ‘उजडा चमन’ किंवा ‘गॉन केश’ असं म्हणून चिडवलं जातं.
मतीचा भाग सोडू, पण असं आपल्या बाबतीत होऊ नये असंच प्रत्येकाला वाटेल. म्हणून केस गळू नयेत याकरिता विविध उपाय केले जातात, परंतु तोपर्यंत उशीर झालेला असतो.
तसे आपले केस रोज एका ठराविक मर्यादेत निघतात. परंतु केस गळतीचे प्रमाण जास्त असेल, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे.
खरंतर अशा केस गळतीला आपणच कुठेतरी जबाबदार असतो. आपल्याकडूनच अशा काही चुका होतात, की त्यामुळे केस गळायला सुरुवात होते.
आपल्याला जर आपले केस घट्ट आणि घनदाट हवे असतील तर पुढील गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.
येथे पहा : – केस गळती चे कारणे जाणून घ्या ?