GST Rates: चित्रपटप्रेमींच्या खिशावरील बोजा कमी होणार, जीएसटी दर घटला, पण ही चूक टाळा!

GST Tax on Food Served in Cinema Halls : आता जर तुम्हाला सिनेमात स्वस्त पॉपकॉर्न आणि कोला ड्रिंक्सचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्हाला थोडी समज दाखवावी लागेल. जीएसटीच्या दरात बदल करून सरकारने सिनेमागृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थावरील कर कमी केला असून सरकारच्या या निर्णयाचा फायदा घ्यायचा असेल तर एक चूक टाळावी.

नवी दिल्ली : चित्रपटगृहांमध्ये मिळणाऱ्या महागड्या खाद्यपदार्थांपासून चित्रपट प्रेमींना आता काहीसा दिलासा मिळाला आहे. मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पेय पदार्थांवरील जीएसटी १८% वरून ५ टक्के करण्यात आला असून चित्रपटगृहांमधील खाण्यापिण्यावरील जीएसटी दरात १३ टक्के कपात केल्याने तुम्हाला काहीसा दिलासा मिळणार आहे. चित्रपट गृहांमध्ये पॉपकॉर्न, पेप्सी, नाचोस, बर्गर, सामोसा इत्यादी खरेदी करणे यापुढे आता पूर्वीपेक्षा स्वस्त असेल, पण जीएसटी कौन्सिलच्या निर्णयात एक पेच आहे.

चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ स्वस्त पण काय …
अलीकडेच झालेल्या ५०व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत सिनेमागृहात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांवरील जीएसटी करात कपात करण्यात आली आहे, परंतु हा दिलासा तुम्हाला फक्त एका अटीवर मिळेल. जर तुम्ही थिएटर किंवा मल्टिप्लेक्समध्ये जाऊन खाद्यपदार्थांची खरेदी केल्यास तुम्हाला दिलासा मिळू शकतो. जर तुम्हाला ऑनलाईन चित्रपटाचे तिकिटं बुक करताना खाण्यापिण्याची कॉम्बो ऑफर खरेदी करण्याची सवय असेल तर तुम्हाला सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार नाही.

तिकिटासह खाद्यपदार्थ बुक करणे टाळा
म्हणजे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही चित्रपटगृहात एखादा सिनेमा पाहण्यासाठी ऑनलाईन तिकिटे बुक कराल तेव्हा कॉम्बो ऑफर घेणे टाळा. कॉम्बो ऑफर म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाइन ॲप किंवा वेबसाइटवरून चित्रपटाचे तिकीट बुक करता तेव्हा तुम्हाला कॉम्बो ऑफरचा पर्याय मिळतो, ज्याद्वारे तुम्ही आधीपासूनच खाद्यपदार्थ आधीपासूनच बुक करू शकता, पण असे केल्यास तुम्हाला जीएसटी कपातीचा फायदा मिळणार नाही.

tc
x