Goverment Scheme : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय: ३४५ नवीन पाळणाघरे उभारणार

Goverment Scheme : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘मिशन शक्ती’ योजनेतील सामर्थ्य कार्यक्रमातील राज्यात पाळणाघर (अंगणवाडी कम क्रेश) योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार ३४५ पाळणाघरे सुरू करण्यात येणार असून, त्यात पाळणाघर सेविका, पाळणाघर मदतनीस असे प्रत्येकी एक पद निर्माण करण्यात येणार आहेत. महिला आणि बालविकास विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मानधन किती दिले जाणार ?

पाळणाघर योजनेत प्रति पाळणाघर वार्षिक खर्च ३ लाख ३६ हजार ६०० रुपये आहे. त्यात पाळणाघरातील अंगणवाडी सेविका यांना १५०० रुपये भत्ता, अंगणवाडी मदतनीस यांना ७५० रुपये भत्ता, पाळणाघर सेविका यांना ५५०० रुपये, पाळणाघर मदतनीस यांना ३००० रुपये मानधन दिले जाणार आहे.

पाळणाघरासाठी काय सेवा प्रदान केली जाणार?

>>> येथे क्लिक करा <<<

tc
x