राज्यातील तलाठी गट ‘क’ संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. सरकारने ही भरती शिथिल केल्यानंतर भूमी अभिलेख विभागाकडून लवकरच परीक्षा घेणार आहे. त्यासाठी लिंक ओपन करण्यात येईल. त्यानुसार राज्यातील सहा विभागांतर्गत 36 जिल्ह्यांतील 4 हजार 644 पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, कोकण, अमरावती राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आदिवासी लोकसंख्या अधिक आहे. यानुसार तलाठ्यांच्या भरतीमध्ये आदिवासी समाजातील नागरिकांना संधी देण्यासाठी ‘पेसा’ नियमांतर्गत जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. ही परीक्षा घेण्यासाठी भूमी अभिलेख विभागाने टीसीएस कंपनीची निवड केली आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कंपनीने 17 ऑगस्ट किंवा 12 सप्टेंबर या दोन तारखांचा पर्याय दिला आहे. यासंदर्भात शासनाला कळविण्यात आले आहे. याबाबत जमाबंदी विभागाचे अतिरिक्त आयुक्त “आनंद रायत” म्हणाले,
या परीक्षेसाठी सुमारे पाच लाख उमेदवार अर्ज करण्याची शक्यता आहे. एका जिल्ह्यातून एक उमेदवार अर्ज करू शकतो. परीक्षा शुल्क सर्वसाधारण गटासाठी 1000 रुपये आणि आरक्षण गटासाठी 900 रुपये असेल.
सदरील भरती प्रक्रिया राबविण्यासाठी खालील प्रमाणे विभागनिहाय/ जिल्हानिहाय पदे भरण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.
तलाठी/ मंडळ अधिकारी पदांच्या ३६२८ जागा
पुणे विभाग – पुणे जिल्ह्यात ३८६ जागा, सातारा जिल्ह्यात ८९ जागा, सांगली जिल्ह्यात ६१ जागा, सोलापूर जिल्ह्यात १३० जागा आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३६ जागा असे एकूण ७०२ जागा
अमरावती विभाग – अमरावती जिल्ह्यात ४० जागा, अकोला जिल्ह्यात ९ जागा, यवतमाळ जिल्ह्यात ६३ जागा आणि बुलढाणा जिल्ह्यात १२ जागा असे एकूण १२४ जागा
नागपूर विभाग – नागपूर जिल्ह्यात ११० जागा, वर्धा जिल्ह्यात ५८ जागा, भंडारा जिल्ह्यात ४४ जागा, गोंदिया जिल्ह्यात ५७ जागा, चंद्रपूर जिल्ह्यात १५६ जागा आणि गडचिरोली जिल्ह्यात १३३ जागा असे एकूण ४५८ जागा
औरंगाबाद विभाग – औरंगाबाद जिल्ह्यात १३६ जागा, जालना जिल्ह्यात ९३ जागा, परभणी जिल्ह्यात ८९ जागा, हिंगोली जिल्ह्यात ७१ जागा, नांदेड जिल्ह्यात ९८ जागा, लातूर जिल्ह्यात ४६ जागा, बीड जिल्ह्यात १६१ जागा आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ११५ जागा असे एकूण ७९९ जागा
नाशिक विभाग – नाशिक जिल्ह्यात २०४ जागा, धुळे जिल्ह्यात १९४ जागा, जळगाव जिल्ह्यात १७० जागा आणि अहमदनगर जिल्ह्यात २३६ जागा असे एकूण ८०४ जागा
कोकण विभाग – मुंबई (शहर) मध्ये २३ जागा, मुंबई (उपनगर) मध्ये ३४ जागा, ठाणे जिल्ह्यात ८२ जागा, पालघर जिल्ह्यात १०२ जागा, रायगड जिल्ह्यात १६२ जागा, रत्नागिरी जिल्ह्यात १२१ जागा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११७ जागा असे एकूण ६५१ जागा
सहकार्य करा:- तलाठी भरतीची ही जाहिरात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करा