विमान प्रवास म्हणलं की सगळ्यांची नजर वर आकाशाकडे जाते. आता या विमान प्रवासाची सगळ्यांची इच्छा एअर इंडिया कंपनी पूर्ण करणार आहे.
26 जानेवारी: भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कंपनीने सर्वात स्वस्त तिकिटांची घोषणा केली आहे. ही तिकिटे इकॉनॉमी क्लासमध्ये असून ही ऑफर देशांतर्गत उड्डाणांवर लागू करण्यात आलेली आहे. यानुसार फक्त 1700 रुपयांमध्ये तुम्हाला विमान प्रवास करायला मिळणार आहे. यामध्ये 49 हून अधिक शहरांची नावे आहेत.
26 जानेवारी: एअर इंडियाने दिलेली हि ऑफर कमी कालावधीसाठी आहे. हि ऑफर शनिवार 21 जानेवारीपासून सुरू झाली असून 23 जानेवारीपर्यंत वैध आहे. एअरलाइनच्या अधिकृत ट्रॅव्हल एजंटसह सर्व एअर इंडिया बुकिंग प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी हि उपलब्ध करण्यात आलेली आहे.
या ऑफर अंतर्गत बुक केलेल्या तिकिटावर तुम्ही 1 फेब्रुवारी ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच्या प्रवासाची योजना करू शकता.
व्हाटसअँप वर मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट. आत्ताच जॉईन करा.