X

Good News : एसटी ने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर आता बुकिंग होणार आँनलाईनच !

एसटी महामंडळाने प्रवाशांना अॅपवर एसटी तिकीट बुक करण्याचा पर्याय दिला आहे. ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे.

एसटी महामंडळाच्या बससेवेची महाराष्ट्राच्या दळणवळणात महत्त्वाची भूमिका आहे. सर्वसामान्यांपासून सर्वचजण बसमधून प्रवास करत असतात. मात्र, अनेकदा लांबच्या प्रवासासाठी जागा मिळवणे हे आव्हानात्मक असते. जागा मिळाली नाही, तर लांबचा प्रवास कठीण होऊन बसतो. त्यामुळे एसटी महामंडळाच्या तिकीट आरक्षणाला प्रवासी प्राधान्य देतात. मात्र, अनेकवेळा महामंडळाच्या वेबसाइटवर जाऊन तिकीट काढताना तांत्रिक अडचणी येतात. आता यावर उपाययोजना करत महामंडळाने प्रवाशांना अॅपवर एसटी तिकीट बुक करण्याचा पर्याय दिला आहे. ही सुविधा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एका कार्यक्रमात ही माहिती दिली.

सध्याच्या तिकीट आरक्षण प्रणालीत नेमक्या काय त्रुटी ?

सध्या एसटी महामंडळाच्या वेबसाइटवर तिकीट बुक करताना अनेकदा प्रवाशांच्या खात्यातून पैसे कापले जातात, मात्र सीट आरक्षित होत नाही. यानंतर संबंधित प्रवाशांना ते पैसे मिळवण्यासाठी अनेकवेळा हेलपाटे मारावे लागतात. तसेच, आरक्षित जागा असलेल्या बसेस अनेकदा तिकीट आरक्षित करण्यासाठी उपलब्ध नसतात. तिकीट बुक केल्यानंतर चुकीच्या सीट क्रमांकाच्या तक्रारीही प्रवाशांनी केल्या आहेत. तिकीट आरक्षित करताना महामंडळाची वेबसाईटही बंद झाल्याचे अनुभवही प्रवाशांना आले आहेत.

नवीन अॅपद्वारे बुकिंगमध्ये काय उपायोजना आहे?

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या नवीन अॅपवर प्रवाशांना केवळ डेबिट-क्रेडिट कार्डद्वारेच नव्हे, तर मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या द्वारे तुम्ही देखील पैसे देऊ शकता गुगल पे, पेटीएम, अमेझॉन पे यांच्या माध्यमातूनही पेमेंट करता येणार आहे . या अॅपवर प्रवाशांना त्यांनी ज्या बससाठी तिकीट आरक्षित केले आहे , त्या बसचे नेमके ठिकाणही पाहता येईल. त्यामुळे बसची प्रतीक्षा थांबणार आहे. तसेच, प्रवासी त्यांचे काम करू शकतात आणि बसच्या वेळेत उपस्थित राहू शकतात. या सुविधेसाठी राज्यातील 11 हजार बसेसमध्ये वाहन निरीक्षण यंत्रणा वापरण्यात येणार आहे.

This post was last modified on %s = human-readable time difference 12:07 pm

Davandi: