Generic drugs : आजारी पडल्यावर आपल्या आरोग्यवर झालेला परिणाम दिसतो. यासोबतच आपल्या खिशालाही चाप बसलेला असतो. कारण औषधे खूप महाग असतात. डॉक्टरांनी महागडी ब्राण्डेड औषधे लिहून दिल्यास रुग्णांचे जास्त पैसे खर्च होतात. यातून रुग्णांना दिलासा मिळावा, यासाठी केंद्र सरकारने जनेरिक औषधे वापरण्याचे आवाहन केले आहे.
जेनेरिक औषधे म्हणजे काय?
- औषध उत्पादक कंपन्या रोगांवर उपचार करण्यासाठी केलेल्या संशोधनाच्या आधारे क्षार बनवतात. त्याचे रूपांतर गोळ्या, कॅप्सूल किंवा इतर औषधांमध्ये होते. वेगवेगळ्या कंपन्या एकच क्षार वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या किमतीला विकतात. क्षाराचे जेनेरिक नाव विशेष समितीने रचना आणि रोग लक्षात घेऊन ठरवले आहे.
Generic drugs औषधाच्या किमतीत पाच ते दहापट फरक
- कोणत्याही क्षाराचे जेनेरिक नाव जगभर सारखेच असते. असे असताना जेनेरिक औषध घेऊन तुम्ही डॉक्टरांनी सांगितलेले प्रिस्क्रिप्शन अगदी कमी किमतीत मिळवू शकता. महागडे ब्रँडेड औषध आणि त्याच क्षाराच्या जेनेरिक औषधाच्या किमतीत पाच ते दहापट फरक असू शकतो. कधीकधी किमतीतील फरक 90 टक्क्यांपर्यंत असू शकतो.
परिणामात नसतो फरक
- दोन औषधांच्या परिणामात फरक नसतो. फरक फक्त नाव आणि ब्रँडमध्ये असतो. औषधे क्षार आणि रेणूंपासून बनवली जातात. त्यामुळे औषध खरेदी करताना ब्रँड किंवा कंपनीकडे लक्ष न देता क्षाराकडे लक्ष दिले पाहिजे, असे तज्ज्ञ सांगतात.