Gauri Aagman 2024 : गौरी आवाहनाचे महत्त्व

Gauri Aagman 2024 : गौरी आगमन

या दिवशी माता गौरी म्हणजे माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते.

गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धरतीवर अवतरित झाली होती, असे मानले जाते.

गणरायाप्रमाणेच गौरींचेदेखील उत्साहत स्वागत होते. यावेळी फुलांनी आणि कलाकुसरीच्या वस्तूंनी सजावट केली जाते.

बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुखवटे मिळतात. यामध्ये शाडू, पितळे, कापडी, फायबरचे असे काही प्रकार पाहायला मळातात.

काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात.

कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते.

तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रितही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते.

प्रत्येक कुटुंबात आपआपल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात.

मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते.

गौरी आवाहन शुभ मुहूर्त : –

गौरी आवाहन शुभ मुहूर्तज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त १० सप्टेंबर रोजी सूर्यदयापासून ते संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत.

राहू काळ : दुपारी ३ ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. अनुराधा नक्षत्र समाप्ती : १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत असेल

>>>> शासनाकडून 50 हजार योजनादूतांची भरती. <<<<

tc
x