G20 परिषदेची आजपासून सुरुवात.
📲 जाहिरातीसाठी संपर्क: 9975167791
📲 https://davandi.in/2023/01/06/आपली-जाहिरात-आपला-ब्रँड-प/
G20 परिषदेसाठी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, चीनचे पंतप्रधान ली कियांग आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे नवी दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग हे दोघे येणार नसल्याचे आधीच कळवले होते.
🦸🏻♂️अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळं त्यांच्या येण्याबाबत स्पष्टता नव्हती. मात्र, आता बायडन यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बायडन G20 साठी भारतात दाखल होत आहेत. सर्वच जागतिक नेत्यांच्या सुरक्षेसाठी भारताने उच्चतम सुरक्षा पुरवण्याची तयारी केली आहे
या परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद होणार आहे.
🗣️ G20 परिषदेतून भारताला मिळाली ब्रिटनची साथ, दहशतवाद्यांविरोधी लढ्यासाठी ऋषी सुनक यांचं मोठं आश्वासन
🤗 जीवन : रडायचं नाही आता हसायचं आहे, स्वतःसाठी आता थोडं जगायचं आहे‼️
📢 https://davandi.in/2023/02/02/life-dont-cry-laugh-now-live-a-little-for-yourself/
◾ आजपासून सुरू होणाऱ्या G20 परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे आज भारतात दाखल झाले. पालम विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे आणि भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त ऍलेक्स एलिस यांनी त्यांचं स्वागत केलं.
◾ ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यादेखील त्यांच्यासह भारतात आल्या आहेत. त्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक नृत्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दिल्लीत दाखल होताच ऋषी सुनक यांनी एएनआयला मुलाखत दिली.
◾ या मुलाखतीत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांनी खलिस्तान्यांनाही स्पष्ट संदेश दिला. दहशतवाद्यांविरोधी लढ्यासाठी भारतासोबत काम करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
🚨 स्पर्धा परीक्षा झटक्यात होईल क्रॅक, हे पाच – R वाचा ‼️
📢
https://davandi.in/2023/02/02/competitive-exams-crack-any-competitive-exam-in-no-time-these-5-rs-of-study-are-important/
This post was last modified on %s = human-readable time difference 7:07 am