मराठी भाषा संवर्धन काळाची गरज

२७ फेब्रुवारी चला करु या मराठी चा उदो उदो…….
“कम आॅन गाईज चला आज सर्व मराठीत बोलू या”….
व्हाय? अरे यू डोन्ट नो आज मराठी भाषा संवर्धन दिन आहे.
आपल्याला तो सेलिब्रिट करायचा आहे. कस करु या काही आयडिया द्या ना…
हे मराठी गाणी म्हणू या नको मी तर रॅक स्टार पाॅप म्युझिक ऐकते…… बरं जाऊ देत दुसर काही….

इतक्यात एक मराठी ची प्रोफेसर उभी राहते व म्हणते, बघा माझ मत पटल तर नाही तर जाऊ देत.
बोला मॅडम…. २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन आहे तो आपण साजरा करायला जमलो आहोत.
आपल्या सर्वाच मराठी कच्चे होत चालले आहे अस नाही का वाटत तुम्हाला ? इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकतो मग काय शिंग फुटतात. मराठी फक्त बोली भाषा राहिली आहे. पण त्यात सुध्दा कामवाली बाई पासून मालकीणी पर्यंत सरार्स इंग्रजी शब्द वापरले जातात.

प्रथम आपण मुलांना व्याकरण शिकवू. मराठी भाषा जशी वळवावी तशी वळते. तिचे सौंदर्य तिची नजाकत वाखाणण्याजोगी आहे.
कवी शिरवाडकर यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस पाळला जातो. मराठी भाषेचा उगम संस्कृत मधून झाला मोडीलिपी, देवनागरी लिपी, ह्यातूनच अक्षर ओळख झाली आहे. मराठी भाषा एक असली तरी तिची अष्टपैलू किरणे वेगळीच चमक दाखवतात. गाव प्रांत बदला की भाषेत थोडा फार फरक पडत जातो. वस्तू एक पण ती प्रत्येक ठिकाणी नवीन नावाने ओळखली जाते.
अरे बापरे….!.. ही तर आमच्या साठी खरच अद्भूत माहिती आहे. हो ना मराठी साहित्य आपण वाचत नाही. वेदशास्त्र तर दूर पर्यंत ओळख नाही. ज्या मातीत जन्मलो, जिची मातृभाषा शिकलो, साधूसंतांची पवित्र पावन भूमी तिलाच आपण विसरत चाललो आहोत.

“मी मराठी झी मराठी” हे दूरदर्शन वर ऐकायला किती छान वाटते. आपण नकळतपणे ते गुणगुणतो. पण त्याचा खरा मतितार्थ जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाही.

अहो! एक दिवस मराठी भाषा दिवस पाळून काय उपयोग?
मनातून वाटले पाहिजे मी मराठी…!! महाराष्ट्र माझा तरच तुम्ही भावी पिढीच्या मनावर चांगले संस्कार घडवू शकता.
खेडेगावातील भाषा अशुद्ध व रांगडी असते पण त्यात एक गोडवा लपलेला असतो. आजकाल अशी भाषा कुठे ऐकायला पण मिळत नाही. म्हणूनच की काय देव जाणे माणस माणसाला परकी झालीत.
‘मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.’

मराठी माझी मायबोली
करु तिचे आम्ही जतन
अंतःकरणात पुजनीय
मराठी बाणा माझे वतन

जर आपण मराठी बोललो नाही तर हळूहळू ती भाषा लुप्त होईल. मराठी भाषेत हिंदी व इंग्रजी शब्दांची भेसळ झाली आहे……
उदाहरण सांगते… टि. व्ही, टेलिफोन अश्या प्रकारचे शब्द मराठी नाहीत. काय ? सगळे एका सूरात आश्चर्यचकित होऊन ओरडले. मग मराठी शब्द काय आहे ? दूर दर्शन, दूरध्वनी…. अरे हो ना खरच तुला मराठी भाषेच किती ज्ञान आहे.

आधुनिक काळातील सावित्रीबाई होऊन तू आम्हाला किटी पार्टी, मंडळ येथे मराठी शुद्ध कसे बोलावे हे शिकव मग आम्ही घरी जाऊन आमच्या मुलांना शिकवू. म्हणतात ना चांगल्या कामाची सुरुवात स्वतःपासून प्रथम करावी.
काही लोक परदेशात जाऊन स्थायिक झाली तरी त्यांनी आपल्या मराठी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार फडकवला आहे. अशा मुठभर लोकांना आपण साथ देऊ या..

उठा मातानों जागे व्हा.. आपण सारे मिळून मराठी अस्मिता जागृत करुन ती जपूया. मी मातानों असा उल्लेख का केला सांगा बरं…..
अगदी बरोबर! मायबोली मुल आई कडूनच शिकतात.
आईची भाषा ही मातृभाषा असते.

आपण मुलांना जे काही शिकवणार तेच मुल शिकतात.
मुलांवर चांगले संस्कार करण्याची पालकांची जबाबदारी असते. तुम्ही प्रथम मराठी नीट बोलायला शिका आपसूकच मुल तुमच अनुकरण करतील. तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषा संवर्धन व समृद्ध होईल.

सौ.रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर

tc
x