FASTag : नवीन दणका! FASTag नसल्यास दुप्पट टोल भरावा लागणार; NHAI चे कडक नियम

FASTag : नवी दिल्ली: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे FASTag बाबत जाहीर केलेले नवीन नियम वाहनचालकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहेत. अनेक वाहनचालकांना अद्याप या नियमांची माहिती नाही आणि त्यामुळे दुप्पट टोल भरण्यास ते भाग पडत आहेत.

नवीन नियमानुसार:

  • ज्या वाहनांवर FASTag नसेल त्यांना दुप्पट टोल भरावा लागेल.
  • विंडस्क्रीनवर FASTag न लावणाऱ्या वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

FASTag : टोल नाक्यावर लावले जातील फलक

‘एनएचएआय’ला या नव्या नियमांबद्दल जागरूकता पसरवायची आहे.FASTag हा नवा नियम सर्वच वाहनचालकांना कळावा यासाठी त्यांनी सर्व टोलनाक्यांवर या नियमाची माहिती स्पष्टपणे देणारे फलक लावण्याचे आदेश दिले आहेत. नियमांचे पालन न केल्यास वाहनचालकांना दंड होऊ शकतो,

या नियमांमुळे अनेक वाहनचालक त्रस्त झाले आहेत. अनेकांना FASTag कुठून आणि कसे मिळवायचे हे माहित नाही. तर काही वाहनचालकांनी FASTag खरेदी केले आहे, परंतु ते त्यांच्या वाहनांवर योग्यरित्या लावलेले नाही. यामुळे टोल प्लाझांवर वादविवाद आणि रांगा लागत आहेत.

NHAI ने वाहनचालकांना या नियमांबाबत जागरूक करण्यासाठी प्रचार मोहीम सुरू केली आहे. तथापि, अद्यापही अनेक वाहनचालकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकलेली नाही.

FASTag : या गोंधळामुळे काही उपाययोजनांची आवश्यकता आहे: >>>येथे क्लिक करा <<<

tc
x