Estate Will : संपत्तीसाठी इच्छापत्र लिहिताना काय काय लक्षात ठेवावं?

Estate Will : मृत्यूपत्र न करताच जर एखाद्याचा मृत्यू झाला तर साहजिकच मालमत्ता वारसा कायद्यानुसार वाटली जाईल. म्हणून प्रत्येक व्यक्तीने हयातीत असताना इच्छापत्र करणे आवश्यक आहे, पण असे करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.

तुम्ही तुमची संपत्ती कुठे आणि कशी वाटप करायची हे निश्चित करण्यासाठी इच्छापत्र हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज आहे. मात्र, योग्यरित्या तयार न केल्यास, इच्छापत्र वाद आणि कायदेशीर गुंतागुंतीमध्ये अडकू शकते.

Property documents : इच्छापत्र लिहिताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत:

स्वतःशी, कुटुंबाशी, संस्थेशी संबंधित महत्त्वाची माहिती द्या…

मृत्युपत्रात इच्छापत्र लिहिणारी व्यक्तीची वैयक्तिक आणि जवळच्या कुटुंबातील सदस्यांचा तपशील जसे की नाव, पत्ता आणि UID क्रमांक, तुमचे व कुटुंबातील सर्व सदस्य किंवा तुम्हाला या मृत्यूपत्रात लिहायचे असलेल्या व्यक्तीचे नाव आणि सर्व तपशील सविस्तर स्पष्टपणे नमूद करा. इच्छापत्रांतर्गत तुम्ही ज्या संस्थांना तुमच्या मालमत्तेचा हिस्सा देत असाल अशी कोणतीही संस्था असेल तर त्या संस्थेचा तपशीलही देणे आवश्यक आहे.

गुंतवणुकीचा तपशीलवार पुरावा

पोर्टफोलिओ नंबर, फिक्स्ड डिपॉझिट किंवा म्युच्युअल फंडातील व्यवहारांमुळे किंवा मॅच्युरिटीमुळे बदलत राहणारा कोणताही नंबर यांसारख्या बारीकसारीक तपशीलांचा उल्लेख करण्याची गरज नाही. ग्राहक आयडी, बचत खाते क्रमांक, डीमॅट खाते क्रमांक, पॉलिसी क्रमांक, जे अद्वितीय आहेत आणि बदलत नाहीत, यांचा उल्लेख केला पाहिजे. तसेच संयुक्त खाती/गुंतवणुक, संयुक्त धारकांची नावे देखील इच्छापत्रात समाविष्ट करा.

शेअर बाजारातील गुंतवणुकसंबंधी कागदपत्रे
>>> येथे क्लिक करा <<<

tc
x