X

Election 2024 : राज्यात आचारसंहिता लागू, निवडणूक रंगत वाढली! 44 दिवसांचा प्रचार युद्धाचा आराखडा जाहीर

Election 2024

Election 2024 : विधानसभेची निवडणूक वेळेत होवून २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरिता १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. ८) कॅबिनेट बोलावण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते..

दरम्यान, मागील आठवड्यात मंत्रिमंडळाच्या सलग दोन दिवस बैठका पार पडल्या असून आता आज पुन्हा कॅबिनेट बोलावण्यात आली आहे. या बैठकीच्या अनुषंगाने मंत्रालयातील विविध विभागांमध्ये सोमवारी दिवसभर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या असून या कॅबिनेटमध्ये १०० हून अधिक विषय ठेवले जाणार आहेत.

दरम्यान, या कॅबिनेटमध्ये आणखी कोणत्या योजनांची घोषणा होणार, कोणत्या घटकांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. १३ ऑक्टोबरला आचारसंहिता जाहीर झाल्यास बरोबर दिवाळीनंतर मतदान होईल आणि २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार सत्तेत येवू शकेल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सागितले. या पार्श्वभूमीवर सध्या मंत्रालयातील हालचाली गतिमान झाल्याचे चित्र आहे.

निवडणुकीसाठी साधारणत: लागतात ३५ दिवस


Election 2024 : राज्याचे नवीन सरकार २६ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होणे आवश्यक आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संपूर्ण तयारी झाली असून निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून निकालापर्यंत साधारणपणे ३० ते ३५ दिवस लागतात.

हेही वाचा  : शिष्यवृत्ती : मुलींना मिळणारी शिष्यवृत्ती झाली तिप्पट! राज्य सरकारचा मोठा निर्णय!

असा असणार प्रोग्राम

  • आचारसंहितेनंतर तयारी : ५ ते ६ दिवस
  • उमेदवारी अर्ज भरणे : ७ दिवस
  • छाननी व अंतिम यादी : १ दिवस
  • अर्ज माघार : २ दिवस
  • प्रचारासाठी दिवस : १२ ते १५ दिवस
  • मतदान व निकाल : ३ ते ४ दिवस
  • सरकार स्थापनेसाठी अवधी : १० ते १२ दिवस

कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा..

हेही वाचा : लाडक्या बहिणींना अन्याय! पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी


हेही वाचा : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?

हेही वाचा : बांधकाम कामगारांसाठी सरकारी योजनांचा लाभ घ्या: नोंदणी कशी करावी?

This post was last modified on %s = human-readable time difference 8:52 am

Davandi: