Earthquake In Marathwada : नागरिकांत भीतीचे वातावरण मराठवाडा, विदर्भात धरणीकंप; परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के
संपूर्ण माहिती येथे पहा
मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. 10 जुलै रोजी पहाटे झालेल्या या धरणीकंपामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत भूकंपाचा धक्का
जिल्ह्यातील विविध भागांत भूकंपाचा धक्का बसला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हा धक्का जाणवला आहे. परभणी शहर, सेलू, गंगाखेड आदी भागात भुकंपाचा हा धक्का जाणवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता.
हिंगोली जिल्ह्यातही धरणीकंप, जीवितहानी नाही
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पहाटे 7:15 च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीत झालेला हा भूकंप 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता.
वाशिममध्ये नागरिकांत भीती >>> हेही वाचा <<<