E -sewa kendra : घरात बसून सर्व सरकारी सेवा: महा ई सेवा केंद्र सुरू करण्याची सोपी पद्धत!

E -sewa kendra : केंद्र सरकारने तयार केलेल्या नॅशनल ई-गव्हर्नन्स योजनेअंतर्गत, सामान्य सेवा केंद्र योजना (CSC) , ज्याला महाराष्ट्रात महा ई-सेवा केंद्रे म्हणून ओळखले जाते. महा-ई-सेवा केंद्र देशातील लोकांना सरकारी सेवा चा लाभ चांगल्या प्रकारे मिळावा या हेतूने सरकारकडून सर्व सरकारी सेवा डिजिटल केल्या जात आहेत. या हेतूने सरकारने महा-ई-सेवा केंद्र ही योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळण्यासाठी महा ई सेवा केंद्राचा वापर केला जातो.

महा ई सेवा केंद्राचे उद्देश

महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी महा-ई-सेवा केंद्र स्थापन करण्याचे मुख्य उद्देश आहेत.

महा-ई-सेवा केंद्र स्थापन करण्यामागील सरकारचा आणखी एक उद्देश म्हणजे नागरिकांना सरकारी योजनेचा लाभ घेता यावा आणि सरकारी योजनेचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा.

महा-ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी आवश्यक पात्रता

अर्जदार व्यक्ती ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे.

अर्जदार व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्ष असावे.

अर्जदार व्यक्ती किमान दहावी उत्तीर्ण असावी.

महा-ई-सेवा केंद्र उघडत असणाऱ्या व्यक्तींना मराठी, हिंदी, इंग्लिश या भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे.

अर्जदार व्यक्तीला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.

महा-ई-सेवा केंद्र उघडण्यासाठी ऑफलाईन अर्ज करा

जर महा-ई-सेवा केंद्र आपल्या शहरात किंवा गावात सुरू करायचे असेल तर जिल्हाधिकाऱ्याची परवानगी असणे महत्त्वाचे आहे.

परवानगी घेण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये अर्जासोबत सर्व कागदपत्रे सादर करावी लागतात.

तुमचे सर्व कागदपत्र तपासल्यानंतर तुम्हाला महा ई सेवा केंद्र चालू करण्यासाठी परवानगी मिळते.

परवानगी मिळाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड मिळतो.

>>> येथे क्लिक करा <<<<

tc
x