E KYC : प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आता ई-केवायसी (e KYC) करणे बंधनकारक झाले आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केल्यास संबंधितांना धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे रेशनकार्ड धारकांनी लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रेशनकार्ड संबधीची ई केवायसी कशी करावी, हे सोप्या स्टेपद्वारे जाणून घेऊयात…
रेशन दुकानात जाऊन..
▪️रेशनकार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते. याच धान्य दुकानात ई केवायसी करण्याची सोय आहे.
▪️या रेशन दुकानदारांकडे फोर-जी ईपॉस मशीन आहेत, या मशीनद्वारे ही केवायसी केली जाते.
▪️यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे. या ठिकाणी या मशीनमध्ये आधार क्रमांक टाकला जातो.
▪️यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली जाते.
हेही वाचा : भारतीय नागरिकांचा आधार, पॅन कार्ड डेटा लीक? ‘या’ दोन वेबसाइटची नावं आली समोर
E KYC : मेरा राशन या अँपच्या मदतीने….
▪️सर्वांत अगोदर प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा राशन हे अँप डाऊनलोड करा
▪️त्यानंतर अँप चालू करून तुमचा रेशनकार्ड क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल.
▪️आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमीट या बटणावर क्लिक करा.
▪️त्यानंतर आधार सिडिंग या ऑप्शनवर यावे.
▪️त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार सिडिंग Yes किंवा No असा ऑप्शन दिसेल.
▪️ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज नाही. आणि ज्या सदस्याच्या नावापढे नो असा ऑप्शन असेल, त्या सदस्याला ई-केवायसी करावी लागेल.
▪️ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
कृपया ही माहिती इतरांना देखील शेअर करा..
हेही वाचा : सीआरपीएफमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 11,000+ पदांसाठी भरती, दहावी पाससाठीही संधी!
हेही वाचा : रोज च्युइंगम चघळणे: फायदे की तोटे? तज्ज्ञांनी केला खुलासा!
हेही वाचा : नोकरीच्या नवीन संधी कशा मिळतात