सांगली : ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे नव्या रस्त्यांची देखील काही दिवसात दुर्दशा होते हे आपण पहिले असेल. मात्र अशा ठेकेदारांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांगलाच दम भरला आहे.
रस्त्याच्या कामात जर गडबड कराल तर थेट बुलडोजर घालू असा दमच केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी ठेकेदाराला दिला आहे.
मंत्री गडकरी हे सांगलीच्या अष्टा या ठिकाणी पेठ सांगली रस्त्याच्या चौपदरीकरण भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्यांनी रस्ते कामावरून ठेकेदारांना चांगलेच धारेवर धरले आहे. दरम्यान थेट मंत्र्यांच्या बोलल्यानंतर किमान ठेकेदार चांगलं काम करणार का? हे येत्या काळात स्पष्ट होईल.
सांगली शहराला पुणे बंगळुरू महामार्गाला जोडणारा पेठ-सांगली या रस्त्याचे कामकाज हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होते.
रस्त्याचे झालेलं अर्धवट काम तसेच मोठं मोठे खड्डे यामुळे वाहनधारकांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागत होते.
यामुळे नागरिकांकडून सरकारविरोधात आक्रोशाची भावना जनतेच्या मनात निर्माण झाली होती.
हा रस्ता केंद्राच्या माध्यमातून करण्यासाठी खासदार, आमदार यांनी पाठपुरावा केला होता.
अखेर केंद्रीय राष्ट्रीय रस्ते विभागाच्या माध्यमातून हा रस्ता सांगली पेठ चौपदरीकरण रस्ता करण्यात येत आहे.
या रस्त्याचे या कामाचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, या रस्त्याच्या कामाला एक महिन्यात सुरुवात होईल त्यानंतर पुढील 25 वर्ष या रस्त्यात एकही खड्डा पडणार नाही, अशा पद्धतीचे काम केलं जाईल.
या रस्त्याच्या कामात ठेकेदारांनी गडबड करता कामा नाही. अन्यथा ठेकेदाराला बुलडोझर खाली टाकू अशा शब्दात नितीन गडकरींनी दम भरला आहे.
This post was last modified on January 28, 2023 10:11 am