कधीपण कुठेपण केव्हापण हे DOCUMENTS राहतील तुमच्यासोबत..
काळाची गरज ओळखा आणि आजच सुरक्षित करा…..
डिजीलॉकर (DigiLocker) भारत सरकारचं क्लाउड डॉक्यूमेंट स्टोरेज वॉलेट आहे.
• डिजीलॉकरमध्ये भारतीय नागरिक आपले सर्व डॉक्युमेंट डिजिटली सुरक्षित ठेऊ शकतात.
• अनेक प्लॅटफॉर्म्सवर डिजीटली ऑथेंटिकेशन देखील करता येतं.
• डिजीलॉकर मध्ये युजर्स आपले महत्वाचे डॉक्यूमेंट जसे की पॅन कार्ड, ड्राईव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, शाळातील मार्कशीट, इंश्योरेंस पेपर, आयुषमान कार्ड स्टोर इत्यादी स्टोर करून ठेऊ शकतात.
• डिजीलॉकरमध्ये भारतीय नागरिक आपले सर्व डॉक्युमेंट डिजिटली सुरक्षित ठेऊ शकतात. तसेच अनेक प्लॅटफॉर्म्सवर डिजीटली ऑथेंटिकेशन देखील करू शकतात.
• याच्या मदतीनं नागरिक सरकारी सेवा, रोजगार, शिक्षा, आरोग्याच्या सुविधांचा सहज लाभ घेऊ शकतात.
डिजीलॉकर अकाऊंट कसं बनवायचं?
स्टेप 1: गुगल प्ले स्टोर (Google Play Store) वरून सर्वप्रथम तुमच्या फोनवर DigiLocker अॅप डाउनलोड करा.
स्टेप 2: अॅप ओपन करा आणि तुमच्या भाषेची निवड करा.
स्टेप 3: स्क्रोल डाउन करा आणि ‘गेट स्टार्ट’ बटनवर टॅप करा.
स्टेप 4: तिथे ‘क्रिएट अॅन अकाऊंट’ वर क्लिक करा.
स्टेप 5: इथे तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाइल नंबर, इमेल आयडी आणि आधार कार्ड नंबर संबंधित माहिती जोडा. त्यानंतर 6 डिजिट सिक्योरिटी पिन सेट करा. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा.
स्टेप 6: तुमच्या तुम्हाला रजिस्टर्ड मोबाइल नंबर आणि ईमेल वर OTP पाठवला जाईल. तुम्हाला OTP सबमिट करावा लागेल, ज्या द्वारे आधारची डिटेल फेच केली जाईल.
This post was last modified on %s = human-readable time difference 10:17 am