लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आणि अविस्मरणीय टप्पा आहे. आपले लग्न संस्मरणीय होण्यासाठी प्रत्येक जणं प्रयत्नशील असतो. आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न आणि लग्नाच्या सर्व विधींना अनन्यसाधारण महत्व.
आपल्या देशात लग्न उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत लग्न कोणत्याही पद्धतीचे असले तरी त्यात हळद हा समारंभ होतो म्हणजे होतोच. लग्नाचा कार्यक्रम छोटेखानी असला काय आणि मोठा सोहळा असला काय तरी हळद होणारच. मागील काही काळापासून लग्नांना एक ग्लॅमर रूप मिळाल्याने हळदीचा कार्यक्रम हा मोठ्या स्वरूपात साजरा केला जातो.
मात्र तुम्ही कधी विचार केलाय का की वधू आणि वराला हळद का लावली जाते?
तर या हळदीबद्दल हिंदु संस्कृती काय सांगते ते पाहूया…..
हळद ही आपल्या हिंदू संस्कृतीत खूप महत्वाची मानली जाते. हळद ही पिवळ्या रंगाची असते. पिवळा रंग हा मैत्री, त्याग आणि समृद्धीचे प्रतिक मानला जातो.
2) हळद लावण्यामागे उपवर वधू वराला त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि संसारासाठी हळद लावून त्यांचा संसार समृद्ध होण्याचा आशीर्वाद दिला जातो.
3.) विविध गुणांनी संपन्न असलेल्या हळदीचे दान हिंदू शास्त्रात खूप मोठे मानले गेले आहे म्हणून मुलाला लावण्यासाठीची हळद मुलीकडून येते आणि मुलीला लावण्यासाठीची हळद मुलाकडून येते.
हे पण वाचा
👩❤️👨 लग्नांनंतर 👭महिलांचा पगार💸 कोणाचा माहेरचा❓ कि सासरचा ❓
4) . भारतात काही ठिकाणी हळदीचा वापर हा दृष्ट काढण्यासाठी सुद्धा केला जातो. लग्नाच्या आधी हळदीने नवरा आणि नवरीची दृष्ट काढली जाते. यामागचे मुख्य कारण म्हणजे हळद लावल्याने नव्याने आयुष्य सुरु करणाऱ्या वधू- वराचे वाईट नजरेपासून रक्षण होते.
5) आपल्याकडे पिवळ्या रंगाला शुभ समजले जाते, शिवाय लग्नात वधूवरांची सौभाग्य गाठ बांधली जाते. हळद आणि कुंकू हे सौभाग्याचे प्रतीक आहे.
6) हळदीला सर्वच धार्मिक विधीत एक महत्त्वाचे स्थान आहे. हळद पवित्र मानली जात असल्यामुळे लग्नात वधूवरांना हळद लावली जाते.
7) तसेच संस्कृतीबरोबरच आरोग्याच्या दृष्टीने देखील हळदीला खूप महत्व आहे ते पाहूया…
8) हळदीच्या वापरामुळे स्त्रियांचा मासिक धर्म सुरळीत होऊन त्यांची गर्भधारणतेची क्षमता वाढते.
हे पण वाचा :-
9) हळद ही प्रजननशक्तीचे दर्शक समजले जाते. हळद लावून मुलीस सासरी पाठ्वण्यामागे त्या घरात लवकर निरोगी संतती येऊन भरभराट व्हावी असा देखील विचार असतो.
10) हळद लावल्यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाते आणि रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे वधू वराची त्वचा एकदम फ्रेश दिसते.
11) सोबतच त्वचेला पुरेसा रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यामुळे तुम्ही रिलॅक्स होता. लग्नाचा ताण कमी करण्यास देखील हळद महत्वाची ठरते.
12) हळद लावल्यामुळे वधू वराची त्वचा अधिक उजळ दिसते. हळदीमध्ये असे अनेक अॅंटीसेप्टिक गुणधर्म असतात ज्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि निर्जंतूक होते. त्यामुळे लग्नाच्या दिवशी तुम्ही अधिक सुंदर दिसतात.