Diwali 2024 : 31 ऑक्टोबर किंवा 1 नोव्हेंबर? कोणती तारीख योग्य? हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव आणि सण म्हणजे दिवाळी…प्रकाशाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. परंतु यंदा दिवाळी म्हणजे लक्ष्मीपूजनच्या तारखेबद्दल संभ्रम निर्माण झालाय. काही लोक म्हणतात दिवाळी 31 ऑक्टोबर तर काही जण 1 नोव्हेंबरला आहे. यामागे सर्व घोळ हा दोन दिवस प्रदोष काळात अमावस्या तिथी आल्यामुळे झाला आहे. अशात महाराष्ट्रात लक्ष्मीपूजन कधी करायचं याबद्दलचा गोंधळ निर्माण झाला आहे.
दिवाळी कधी आहे?
आश्विनी महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळीचा सण साजरा करण्यात येतो. पंचांगानुसार अमावस्या तिथी 31 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजून 12 मिनिटापासून 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजून 53 मिनिटापर्यंत असणार आहे. त्यासोबत प्रदोष काळ आणि वृषभ काळ हे दोन शुभ काळ दिवाळीत पूजेसाठी महत्वाचे आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार प्रदोष आणि वृषभ काळात दिवाळी पूजा किंवा लक्ष्मी पूजा करणे खूप शुभ मानले जाते.
पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितल्यानुसार,
दोन दिवस प्रदोषकाळी आश्विन अमावास्या कमी-अधिक प्रमाणात असली तरी लक्ष्मी-कुबेरपूजन दुसऱ्या दिवशी प्रदोषकालात करावे असे धर्मसिंधू, पुरुषार्थ चिंतामणी, तिथिनिर्णय, व्रतपर्व विवेक इत्यादी अनेक धर्मशास्त्रीय ग्रंथात दिलं आहे.
काही ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात जर तुम्हाला अमावस्या तिथीमध्येच शुक्रवार 1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करायचं असेल तर 5 वाजून 53 मिनिटापर्यंतच करावं लागणार आहे. 1962, 1963 आणि 2013 मध्येही दोन दिवस प्रदोषकालात आश्विन अमावास्या आली होती. त्यावेळीही दुसऱ्या दिवशी लक्ष्मी-कुबेर पूजन केलं होतं असं
लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त
>>>> येथे क्लिक करा <<<<<
This post was last modified on October 31, 2024 5:56 am