Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे बीडचे आमदार धनंजय मुंडे यांच्या गाडीचा ३९ दिवसांपूर्वी परळी मध्ये अपघात झाला होता. हा अपघात झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार झाले होते. यानंतर ते बीडमध्ये आल्यानंतर त्यांच्या स्वागताचा सोहळा पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले. या स्वागतच मुंडेंनी कौतुक केले.
Dhananjay Munde : आता हा आगळा वेगळ्या स्वागत सोहळ्यात तब्बल १०१ जेसीबी होते आणि या जेसीबी मधून तब्बल १० टन फुलांचा वर्षाव मुंडेंवर करण्यात आला. हा आगळा वेगळा स्वागत सोहळा पाहून सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे.
बीडमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम धनंजय मुंडेंनी गोपीनाथ गडावर जाऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांना वंदन केलं. त्यानंतर तिथून ते परळीपर्यंत त्यांच भव्य स्वागत केलं गेलं. या स्वागतासाठी डीजे विद्युत रोषणाई होती. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच जोश होता. आणि विशेष म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी संसदेची प्रतिकृती लावली होती.
मुंडे मुंबईवरून थेट गहिनिनाथ गडावर दर्शनासाठी पोहोचले. आणि तेथे समर्थांकडुन त्यांच विशेष स्वागत करण्यात आले. परळीत लावलेले #tiger abhi jinda hai चे पोस्तर लक्ष वेधून घेत होते.
This post was last modified on %s = human-readable time difference 5:37 am