Complaint of rude employee in bank : बॅंकेत दुर्लक्ष,टाळाटाळ
कशी कराल तक्रार
जर तुम्हाला अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागला असेल आणि समस्या सोडवली गेली नसेल तर तुम्ही तुमच्या समस्येची थेट बँकिंग लोकपालाकडे तक्रार करू शकता.
यासाठी तुम्ही तुमची तक्रार ऑनलाइन पाठवू शकतात.
तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला https://cms.rbi.org.in या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
त्यानंतर जेव्हा होमपेज उघडेल, तेव्हा तुम्हाला तिथे दिलेल्या File A Complaint या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
CRPC@rbi.org.inवर ईमेल पाठवून बँकिंग लोकपालकडेही तक्रार करता येईल.
बँक ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी, आरबीआयचा टोल फ्री क्रमांक १४४४८ आहे.
ज्यावर कॉल करून समस्येचे निराकरण केले जाऊ शकते.