Chief Minister’s Schemes : आशा सेविकांना 1900 मोबाईल, वर्षभराचा रीचार्ज, इन्शुरन्स, मोफत शिक्षण…, 10 मिनिटात फडणवीसांनी सांगितल्या महिलांसाठीच्या 10 मोठ्या योजना
निमित्त होतं ते नागपूर जिल्ह्यातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या लोकार्पण सोहळ्याचं… त्याचवेळी राज्य सरकार महिलांसाठी ज्या 10 मोठ्या योजना राबवत आहे त्याची माहिती अवघ्या दहा मिनिटात देवेंद्र फडणवीसांनी दिली. त्यामध्ये आशा सेविकांसाठीची योजना, मुलींना उच्च शिक्षणाची योजना, महिलांना मोफत गॅस सिलेंडर यासह 10 योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार कशा पद्धतीने महिलांच्या जीवनात बदल घडवतंय याची माहिती फडणवीसांनी दिली.
देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या महिलांसाठीच्या 10 योजना
1. आशा सेविकांना 1900हून अधिक मोबाईलचे वितरण
आजच्या कार्यक्रमात आशा सेविकांना 1900 हून अधिक मोबाईल वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस यांनी आणखी एक घोषणा करत मोबाईल साठी लागणारा वार्षिक रिचार्ज हा देखील मोफत देणार असल्याचे सांगितले. खनिज विकास निधीमधून वर्षाला लागणारा रिचार्जचा खर्च केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
2. आशा सेविकांसाठी 10 लाखांपर्यंतचा इन्शुरन्स
आशा सेविकांसाठी राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांचा इन्शुरन्स काढण्यात येतो अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
3. लाडकी बहीण योजना
राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील अडीच कोटी भगिणींना महिन्याला 1500 रुपयांची मदत देण्यात येते. यासाठी नावनोंदणी सुरू आहे.
4. मुलींना मोफत उच्च शिक्षण
राज्यातील सर्व मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. आतापर्यतं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत केलं होतं. आता उच्च शिक्षणही मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये खासगी महाविद्यालयातील फी राज्य सरकारकडून भरण्यात येणार आहे. या योजनेमध्ये एकूण 507 कोर्सेसचा समावेश आहे.
5. महिलांना प्रवासासाठी अर्धे तिकीट
राज्य सरकारने महिलांसाठी एसटी बसमध्ये 50 टक्के कन्शेशन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिला प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून एसटीही फायद्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.
महिलांसाठीच्या मोठ्या योजना!! >>>येथे क्लिक करा <<<
This post was last modified on %s = human-readable time difference 7:25 am