• सर्वप्रथम तुम्हाला DoT वेबसाइट tafcop.dgtelecom.gov.in वर जावं लागेल.
• यानंतर तुम्हाला आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक टाकावा लागेल आणि ओटीपीसाठी विनंती करावी लागेल.
• आता फोनवर मिळालेला OTP टाकावा लागेल.
• सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला आधार नोंदणीकृत मोबाइल क्रमांक दाखवले जातील.
• तुम्हाला एखादा अनोळखी किंवा अनधिकृत नंबर ब्लॉक करायचा असेल तर तुम्ही त्याची विनंती देखील करू शकता.
आधारकार्डवर किती सिम घेता येतात?
दूरसंचार विभागाच्या वेबसाइटनुसार, तुम्ही एका आधार कार्डवर 9 सिम जारी करू शकता. तुम्ही वेबसाइटवर सक्रिय सिमची संख्या देखील पाहू शकता.
दुसरीकडे, जर तुम्हाला अनधिकृत नंबर बंद करायचा असेल तर तुम्ही ब्लॉक आणि रिपोर्ट या पर्यायावर क्लिक करू शकता.
सिम तपासण्याची सुविधा सध्या सर्व राज्यांसाठी उपलब्ध नाही. पण, लवकरच ती सर्व राज्यांना उपलब्ध करून दिली जाईल.
This post was last modified on %s = human-readable time difference 7:24 am