Live Telecast of Chandrayaan-3 Soft-Landing: संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी भारत घडवणार इतिहास
ISRO’s Chandrayaan-3 Moon Landing Live Updates: भारताच्या चांद्रयान मोहिमेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयानाचं विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंग करणार आहे. रशिया या देशानेही लूना २५ या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र त्यात तांत्रिक बिघाड झाला आणि ती मोहीम अपयशी ठरली. अशात भारताची चांद्रयान मोहीम ही यशस्वी होईल असा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे. आम्ही चांद्रयान २ च्या अपयशातून खूप काही शिकलो आहोत असं वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. या चांद्रयान मोहिमेबाबतच्या प्रत्येक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून–
चांद्रयान ३ मोहिमेत काय बदल करण्यात आला आहे? एस सोमनाथ यांनी दिली माहिती संपूर्ण वाचा
भारताचं चांद्रयान २ ही मोहीम थोडक्यात अपयशी झाली होती. चंद्रावर हे विक्रम लँडर लँड होण्याआधीच इस्रोशी संपर्क तुटला होता. या अनुभवातून धडा घेत चांद्रयान ३ या मोहिमेत महत्त्वाचे बदल केले आहेत. चांद्रयान २ या मोहिमेतील लँडरला पाच इंजिन होते. चंद्रावर उतरताना यानाची गती कमी करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात आला.
हे ही वाचा : – Talathi bharti: तलाठी भरती परीक्षेचा उडाला गोंधळ! तब्बल 12000 विद्यार्थ्यांना नाही देता आली परीक्षा…..
मात्र यातून यानाला झटके बसले. त्यामुळे चुका झाल्या. आता सगळ्या शक्यता लक्षात घेऊन चांद्रयान ३ ची निर्मिती करण्यात आली आहे. चांद्रयान-३ मिशनमध्ये चंद्रावरील लँडिंग एरिया वाढवण्यात आला आहे. ४ किमी x २.५ किती असा एरिया आहे. परिस्थिती बिघडली, तर लँडरला लँडिंगसाठी जास्त जागा मिळावी, हा त्यामागे उद्देश आहे.
ऐन मोक्याच्या क्षणी यानाला लँडिंगची जागा बदलावी लागली, जास्त प्रवास करावा लागला, तर त्यासाठी इंधनही जास्त ठेवण्यात आलं आहे अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली.
चांद्रयान ३ चं लँडिंग कुठे पाहू शकणार आहात? येथे पहा
ISRO च्या माहितीनुसार, जगभरात कुठूनही तुम्ही चांद्रयान-3 मोहिम लाईव्ह पाहू शकता. बुधवारी २३ ऑगस्टला संध्याकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून हे स्ट्रीमिंग थेट प्रक्षेपित केले जाईल. आपण ISRO वेबसाइट, YouTube, ISRO चे Facebook पेज आणि DD National TV चॅनल इथे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकणार आहात.
हे ही वाचा : – CIBIL SCORE: बँकेकडून कर्ज मिळत नाही? CIBIL स्कोर कमी झाला आहे, तो वाढवण्याचे हे सोपे मार्ग
ढोल ताशांच्या मदतीने साकारली चांद्रयानची प्रतिकृती; मोहिमेला ‘रुद्र’च्या अनोख्या शुभेच्छा
बुलढाण्यातील रुद्र ढोल-ताशा पथकाच्यावतीने चांद्रयान-३ ला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या. स्थानिक जयस्तंभ चौकात पथकातर्फे विविध आकारांच्या ढोलचा वापर करून
चांद्रयान ३ मोहीम यशस्वी व्हावी म्हणून धुळ्यात एकवीरा देवीची आरती
चंद्रयान -3 चं यशस्वी लँडिंग व्हावी यासाठी धुळ्यात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने खानदेश कुलस्वामिनी एकवीरा देवीची महाआरती करण्यात आली . यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मराठा संख्येने उपस्थित होते भारत माता की जय घोषणा देखील देण्यात आल्या.
भारताचा तिरंगा आज चंद्रावर कोरला जाणार-दा. कृ. सोमण
चांद्रयान २ ही आपली मोहीम अपयशी ठरली. त्यानंतर आता इस्रोच्या वैज्ञानिकांनी ही काळजी घेतली की या विक्रम लँडवरच्या सेन्सर्सनी काम केलं नाही तरीही सुखरुपपणे उतरणार आहे. यावर चार मोटर्स आहेत. त्यातल्या दोन सुरु झाल्या तरीही सॉफ्ट लँडिंग होईल.
This post was last modified on %s = human-readable time difference 11:11 am