उपवास करून मुलींना मिळतो चांगला नवरा अन मुलांचं काय………..

मुलीने जर सोमवारचा उपवास केला तर तिला चांगला मुलगा मिळतो पण तुम्ही उपवास करून काहीच फायदा नाही, तुम्हाला एमपीएससी मध्ये पास व्हावं लागेल, तेव्हाच तुम्हाला मुलगी मिळेल असं विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हंटलं आहे.

आम्ही पोस्टमन आहोत तुमचा मागणी घ्यायची आणि वर पोहचती करायची, आम्ही आज तुमचे भाऊ म्हणून आलो होतो, काही लोकांना प्रश्न सुटू नेये असेच वाटत होते.

विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुकानाला मोठे कुलूप लावलं आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांकडून साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात राज्य सरकारमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार आणि रयत क्रांती संघटनेचे माजी आमदार सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर अहिल्या शिक्षण मंडळाच्या हॉलमध्ये गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी सदर विधान केले.


आंदोलन केलं त्यावेळी आम्ही सांगत होतो की केसेस आमच्यावर लावा विद्यार्थ्यावर नको, हा निर्णय फडणविस साहेब आणि शिंदे साहेबांच्या कॅबिनेट ने घेतला आहे.तुम्ही फक्त आमच्या नावाने शिमगा केला तुमच सरकार आले तेंव्हा तुम्हीं काहीच नाही केल.

सरकारने गेल्या ६ महीन्यात लोकांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत.
तुमचा निरोप डीसीएम कडे दिला, त्यांचा फोन आला आणि कॅबिनेट मध्ये निर्णय झाला. तुम्हीं आजचा दिवस बरोबर निवडला आंदोलनासाठी, तुम्हाला कळून चुकले की आंदोलन कधी आणि कुठे आणि कसं करायचं आणि कुणाला बोलवायचं त्यामुळे तुम्ही यशस्वी झाला.

तुम्ही केव्हाही आवाज द्याल तिथे आम्ही ओ म्हणणार, आम्ही फाटकी माणस आहोत आम्हाला कशाला टीव्हीवर दिसायचं आहे. आम्ही अनेक विषयावर आंदोलनं केलं, आणि यशस्वी करुन दाखवलं आहे असं पडळकर यांनी म्हंटलं आहे.

tc
x