Business Idea : आपल्यापैकी बरेच जण आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चितपणे विचार करतात, परंतु एका किंवा दुसर्या कारणास्तव, बरेच लोक सुरू करू शकत नाहीत. अनेकांना ठरवता येत नाही की त्यांनी कोणता व्यवसाय सुरू करायचा ज्यातून ते चांगले कमवू शकतात. आज आम्ही तुम्हाला एक उत्तम कल्पना देत आहोत ज्यातून तुम्ही भरपूर कमाई करू शकता.
कडधान्य प्रक्रिया उद्योग
प्रक्रिया उद्योग
“कडधान्यांवर विविध प्रक्रिया करून विक्रीला चांगल्या संधी आहेत. बाजारपेठेत संपूर्ण कडधान्य, डाळ, तळलेले किंवा भाजलेले कडधान्य आणि डाळांच्या पिठाला (बेसन) चांगली संधी आहे. कडधान्य प्रक्रियेसाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे व प्रक्रिया तंत्र उपलब्ध आहे. हरभरा, वाटाणा, मूग, मसूर, चवळी, मटकी ही कडधान्ये पूर्ण दाण्याच्या रूपात उसळीसाठी प्रामुख्याने आहारात वापरली जातात. प्राथमिक प्रक्रिया केलेल्या कडधान्याला चांगली मागणी आहे, याचे मुख्य कारण म्हणजे वेळेची बचत, स्वच्छ आणि प्रतवारी करून एक किलो पॅकिंगमध्ये कडधान्ये विकली तर निश्चितपणे दर चांगला मिळतो. हा उद्योग सुरू करण्यासाठी फारशी गुंतवणूक नाही.
कडधान्यांची स्वच्छता आणि प्रतवारी करण्यासाठी एका यंत्राची गरज आहे. हे यंत्र २५ ते ३० हजार रुपयांत उपलब्ध होते. वजन आणि पॅकिंग यंत्रासाठी ५ ते ७ हजार रुपये खर्च येतो. अशा प्रकारे
३५ ते ४० हजार रुपयांमध्ये उद्योगाची सुरवात करता येते. स्वच्छता आणि प्रतवारी यंत्राची कार्यक्षमता ३ ते ५ क्विंटल प्रति तास इतकी आहे. अशा प्रकारे आठ तासांमध्ये २५ ते ४० क्विंटल कडधान्यांच्या स्वच्छता आणि प्रतवारी करता येते. हे यंत्र एक अश्वशक्तीच्या मोटारीवर चालते. खरीप आणि रब्बी हंगामात कडधान्यांची जागाही कमी लागते. उपलब्धता होत असल्याने किमान ५ ते ६ महिने हा व्यवसाय ग्रामीण भागात चांगल्या प्रकारे करता येतो. उरलेल्या महिन्यात इतर धान्यांची स्वच्छता आणि प्रतवारी या यंत्राच्या माध्यमातून करता येते..
डाळनिर्मिती उद्योग : –
कडधान्यापासून डाळ तयार करण्याची यंत्रे उपलब्ध आहेत. कमी खर्चामध्ये हा उद्योग सुरू होऊ शकतो. या उद्योगामध्ये मिळतो.. प्रामुख्याने कडधान्याची स्वच्छता, प्रतवारी, पूर्व प्रक्रिया, डाळ निर्मिती, प्रतवारी वजन करणे आणि पॅकिंग करणे अशी पद्धत आहे. या उद्योगासाठी डाळ स्वच्छता आणि डाळ निर्मिती यंत्राची गरज आहे. दोन्ही यंत्रांची उपलब्धता ५० ते ६० हजार रुपयांमध्ये होते. उपलब्ध डाळ यंत्राची क्षमता शंभर किलो प्रति तास आहे. अशा प्रकारे आठ तासांमध्ये सात ते आठ क्विंटल डाळ निर्मिती शक्य आहे..
भाजलेले कडधान्य : –
बाजारपेठेत हरभन्याचे फुटाणे, भाजलेले वाटाणे, भाजलेले सोयाबीन या उत्पादनांना वर्षभर मागणी असते. दक्षिण भारतात फुटाणे निर्मितीचे गृहोद्योग आहेत. कडधान्येभाजण्यासाठी यंत्रे उपलब्ध आहेत. या यंत्राच्या किमती कमी आहेत. तसेच
हे ही वाचा:- Business Idea : एक हजार ते पंचवीस हजारपर्यंत भांडवल लागणारे व्यवसाय
बेसन उद्योग : –
आपल्याकडे हरभराडाळीपासून बेसन तयार होते. अलीकडे वाटाण्याच्या डाळीपासून बेसन तयार करतात. बेसन उद्योग हा गृह / कुटीरोद्योग स्तरावर सुरू होऊ शकतात. मोठ्या स्तरावर बेसन उद्योगासाठीही यंत्रांची उपलब्धता आहे. या उद्योगामध्ये चांगला आर्थिक नफा
तळलेल्या डाळी : –
हरभरा आणि मुगाच्या तळलेल्या डाळीस चांगली बाजारपेठ तयार होत आहे. हे पदार्थ तयार करण्याची पद्धती सोपी आहे. गुजरातमध्ये मूगडाळ तळण्याचे कुटीर ते लघु स्तरावर उद्योग आहेत. काही उद्योगांमधून तळलेल्या डाळींची निर्यात देखील होते. तळलेल्या डाळीचा उद्योग गृह स्तरावर करण्यासाठी यंत्राची गरज भासत नाही. जागाही जास्त लागत नाही. एक दिवसात शंभर किलो तळलेली डाळ (हरभरा, मूग) तयार करता येते. खेडेगाव व जवळच्या लहान शहरात आकर्षक पॅकिंगमध्ये या उत्पादनाची विक्री करावी.