Business : व्यवसायामध्ये तुम्हीच नोकर आणि तुम्हीच स्वतःचे मालक असता.
बिझनेस करायचं प्रत्येकाचा जरी स्वप्न असलं तरी, बिझनेस उभारीसाठी लागणारा फंड प्रत्येकाकडे नसतो.
परंतु आता तुम्हाला चिंता करण्याची काहीही गरज नाही.
जर तुम्ही या प्रकारचा बिजनेस सुरू करण्याचा विचार करत असाल तर, बिझनेससाठी लागणारा पैसा तुम्हाला सरकारतर्फे मिळेल.
नेमका कोणता आहे हा बिजनेस? त्याचबरोबर या बिजनेसचा नेमका फायदा काय? जाणून घेऊया सविस्तर.
‘जन औषधी केंद्र’
केंद्र सरकारद्वारा सुरू असलेल्या ‘जन औषधी केंद्र’ या उपक्रमामध्ये तुम्हाला सरकारतर्फे सबसिडी देण्यात येते.
यामध्ये तुम्ही केमिस्टचे दुकान खोलू शकता. म्हणजेच तुम्हाला सर्व प्रकारच्या औषधांचा स्टॉक असलेले दुकान उघडता येईल.
यासाठी केंद्र सरकार तुम्हाला वित्तीय मदत करते. त्याचबरोबर तुम्ही औषध विक्री करण्यासाठी यशस्वी ठरला तर, तुम्हाला 15% इंटरेस्ट दिला जातो.
साध्या शब्दांत उलगडा करून सांगायचे झाले तर, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जन औषधी केंद्र या एक प्रकारच्या योजनेअंतर्गत तुम्ही फक्त सरकारचे जेनेरिक औषध विक्री करू शकता.
औषधी केंद्र खोलण्यास कोण कोण आहे पात्र?
1)जन औषधी केंद्र खोलण्यासाठी एसटी, एससी, आणि दिव्यांग वर्गामध्ये मोडणारे व्यक्ती जन औषधी केंद्र खोलण्यात पात्र आहेत.
2)त्याचबरोबर हे केंद्र खोलण्यासाठी तुमच्याकडे डी फार्मा, बी फार्माचे सर्टिफिकेट म्हणजे तुमच्याजवळ डिग्री असणं गरजेचं आहे.
3)ज्यावेळी तुम्ही हे केंद्र उघडा आलं तेव्हा प्रूफ म्हणून ही डिग्री तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे.
4)याशिवाय एनजीओ किंवा एखादे ट्रस्ट, प्रायव्हेट हॉस्पिटल देखील जन औषधी केंद्र खोलण्यास पात्र आहे.
5)या एजन्सीला राज्य सरकारमार्फत नॉमिनेट केले जाते आणि म्हणूनच केंद्र उघडण्यास हे पात्र ठरतात.
6)दरम्यान रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर, बेरोजगार फार्मासिस्ट आणि कोणताही डॉक्टर जन औषधी केंद्र उघडण्यास पात्र आहे.
7)तर, केंद्र सरकारने अशा तीन पद्धतीच्या केंद्र उघडण्याच्या कॅटेगिरी ठरवल्या आहेत.
जन औषधी केंद्र उघडण्यासाठी अप्लाय करण्याची पद्धत
तुम्हाला औषधांचा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम लायसन काढावे लागेल.
लायसन शिवाय तुम्ही हे काम सुरू करू शकत नाही. लायसन काढण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम janaushadhi.gov.in या वेबसाईटवर जाऊन अप्लाय करायचं आहे.
- सर्वप्रथम फॉर्म डाऊनलोड करा
- फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा
- फॉर्म ब्युरो ऑफ फार्मा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ऑफ इंडिया येथे फॉर्म पाठवा.
- तुम्हाला हा फॉर्म जनरल मॅनेजरच्या नावावर पाठवावा लागेल.
- अशा पद्धतीचा हा बिजनेस सुरू करून तुम्ही प्रचंड पैसे देखील कमावू शकता.
हेही वाचा : तीर्थ दर्शन योजनेसाठी शासनाचे आवाहन..‼️
हेही वाचा : नोकरीच्या नवीन संधी कशा मिळतात