X

Budget 2024 : अर्थसंकल्पानंतर: काय स्वस्त, काय महागलं? सोन्या-चांदीबाबत मोठा निर्णय!

Budget 2024

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प ३.० सादर केला. या अर्थसंकल्पात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी तरतुदी केल्या असून रोजगार व रोजगार निर्मितीसाठी अनेक योजनाही त्यांनी मांडल्या आहेत.

या अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू आणि सेवा स्वस्त होतील? कोणत्या वस्तूंची किंमत असेल? हा प्रश्न सर्वांच्या मनात असतानाच सीतारामन यांनी अनेक वस्तू आणि सेवांवरील कररचनेत बदल करण्याची घोषणा केली आहे.

(Budget 2024 ) : काय स्वस्त होणार (Budget 2024 :

  • अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोबाईल फोन व चार्जरवरील कस्टम ड्युटी (सीमाशुल्क) १५ टक्क्यांनी कमी करत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता मोबाईल फोन व चार्जर्स स्वस्त होतील.
  • सोने व चांदीवरील सीमाशुल्क ६ टक्क्यांनी कमी करण्यात आलं आहे, तर प्लॅटिनमवरील सीमाशुल्कात ६.४ टक्के घट करण्यात आली आहे.
  • कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन प्रमुख औषधांना सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे.
  • सोलार पॅनेलची निर्मिती करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंना सीमाशुल्कातून सूट देण्याचा प्रस्तावही अर्थमंत्र्यांनी यावेळी मांडला.
  • फोन व इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी लागणाऱ्या लिथियन-आयॉन बॅटरीवरील कर कमी करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
  • ई-कॉमर्सवरील टीडीएस रेट १ टक्क्यावरून ०.१ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.
  • फेरॉनिकेल, ब्लिस्टर कॉपरवरील बेसिक कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे.
  • चामड्यापासून बनवलेल्या वस्तू देखील स्वस्त होणार आहेत.
  • २५ महत्त्वाची खणिजे सीमाशुल्कातून वगळण्यात आली आहेत.
  • माशांच्या खाद्यावरील सीमाशुल्क ५ टक्क्यांनी कमी केलं आहे.

अर्थसंकल्पानंतर काय महागणार?

>>>येथे क्लिक करा <<<

हेही वाचा >> महिलासाठी: महिला उद्योगिनी योजना!

This post was last modified on %s = human-readable time difference 8:29 am

Davandi: