BSNL Plan : भारतीय संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL ने आपल्या यूजर्ससाठी वेगवेगळे प्लान आणले आहेत.
आता कंपनीचा एक खूपच स्वस्तातील प्लान आहे. या प्लानची किंमत फक्त ८७ रुपये आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १ जीबी डेटा दिला जातो.
या प्लानमध्ये जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत जास्त बेनिफिट्स दिले जात आहे. यामुळे जिओ आणि एअरटेलचे टेन्शन वाढवले आहे. एअरटेलचा बेसिक प्लानची किंमत वाढून आता १५५ रुपये करण्यात आली आहे. परंतु, बीएसएनएल केवळ ८७ रुपयात जास्त बेनिफिट्स ऑफर करीत आहे.
BSNL च्या प्लानच्या तुलनेत जिओचा प्लान ११९ रुपये किंमतीत येतो. जो ३२ रुपये महाग आहे.
BSNL चा ८७ रुपयाचा प्लान
BSNL चा ८७ रुपयाच्या प्लानमध्ये यूजर्सला एकूण १४ दिवसाची वैधता ऑफर केली जाते. सोबत या प्लानमध्ये डेली १ जीबी डेटा दिला जातो. ग्राहकांना एकूण १४ जीबी डेटा दिला जातो. सोबत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. याशिवाय, गेमिंग बेनिफिट्स दिले जाते. परंतु, या प्लानमध्ये कोणतेही SMS बेनिफिट्स दिले जात नाही.
BSNL चा ९७ रुपयाचा प्लान काय मिळेल प्लॅन मध्ये
जर तुम्हाला डेली डेटा जास्त हवा असेल तर तुमच्यासाठी BSNL ने १५ दिवसाच्या वैधतेचा ९७ रुपयाचा बेस्ट प्लान सुद्धा आणला आहे. या प्लानमध्ये कोणतेही SMS बेनिफिट्स दिले जात नाही. हा प्लान डेली २ जीबी डेटा सोबत येतो. या प्लानमध्ये एकूण ३० जीबी डेटा दिला जातो. तसेच काही अन्य बेनिफिट्स सुद्धा ऑफर केले जाते. या प्लानमध्ये सुद्धा एसएमएसची सुविधा दिली जात नाही.
BSNL चा ९९ रुपयाचा प्लान पहा
जर तुम्हाला फक्त व्हाइस कॉलिंगची सुविधा हवी असेल तर तुमच्यासाठी BSNL ने ९९ रुपये किंमतीचा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये एकूण १८ दिवसाची वैधता दिली आहे. या प्लानमध्ये तुम्हाला कोणताही डेटा किंवा मेसेजिंगची सुविधा मिळत नाही.
जिओचा ११९ रुपयाचा प्लान पहा
या प्लानमध्ये ११९ रुपये किंमतीत १४ दिवसाची वैधता मिळते. डेली १.५ जीबी डेटा ऑफर केला जातो. याप्रमाणे एकूण २१ जीबी डेटा दिला जातो. सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० SMS ची सुविधा मिळते.