VIDEO : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला
पुण्याच्या ऐन मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.
पुणे : पुण्याच्या ऐन मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. पावन मारुती मंदिराजवळ तरूणी थांबली. त्या वेळी हल्लेखोर तरूण तेथे आला. त्याने तरुणीशी वाद घालण्यात सुरुवात केली. तरुणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली.
पहा व्हीडिओ : –
या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली असून पसार झालेल्या हल्लेखोर तरुणचा शोध घेण्यात येत आहे. एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हिचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यांनतर पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.