WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

▪️ नवीन संशोधन! पॅरासिटॅमॉल आणि आयबुप्रोफेन यांसारखी सामान्य औषधं आता कच्च्या तेलाच्या उत्पादनांऐवजी पाईनच्या झाडांमध्ये सापडणाऱ्या पदार्थापासून बनवली जाऊ शकतात.

▪️ ऐतिहासिक निर्णय! विश्वचषकापूर्वी ICC चा मोठा निर्णय, महिला आणि पुरुष संघांना यापुढे समान बक्षीस!

▪️ केंद्र सरकारचा मोठा निर्णय! गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यास निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन थांबवणार

▪️ भारताच्या लेकीची सुवर्ण कामगिरी! युवा धावपटू ज्योती याराजी हिने अवघ्या 13.09 सेकंदात पार केले 100 मीटर अंतर

▪️ बुलढाणा हादरला! 35 वर्षीय महिलेवर 8 नराधमांचा बलात्कार; राजूर घाटातील घटना

▪️ ‘यशस्वी’ भव: 21 वर्षीय जैस्वालचे पदार्पणात शतक, मोडला ४९ वर्षांपूर्वीचा तगडा विक्रम

▪️ जगातील सर्वात मोठा लोकशाही देश सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य नाहीय; मोदींनी व्यक्त केली नाराजी

हे ही वाचा : चांद्रयान-३: चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण कुठे आणि कसे पाहता येणार ऑनलाईन

▪️ बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे अन् राहील, धनंजय मुंडेंचा विश्वास

▪️ पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

▪️ एका ऐतिहासिक उड्डाणासाठी इस्रो सज्ज, श्रीहरीकोटामध्ये सुरु झालं चांद्रयान-3 चं काऊंटडाऊन

▪️ टाटाच नाही, इंडियन आर्मीचा आणखी एक भारतीय कंपनीवर विश्वास; दिली 1,850 कारची ऑर्डर

▪️ गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यास निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन थांबवणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

▪️ सोलापुरातील घटना; दहावीतील विद्यार्थ्याने नववीतील मुलाकडून उकळले तब्बल 10 लाख रुपये

▪️ मोठी कारवाई! कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा दोषी, विजय दर्डा आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा दोषी, 18 जुलैला दिल्ली विशेष कोर्ट शिक्षा सुनावणार

▪️ पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर! पाचवीचा निकाल 22.31 टक्के तर आठवीचा निकाल 15.60 टक्के

▪️ राज्यात मान्सून पुन्हा जोर धरण्याची शक्यता; रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशीम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

▪️ महाराष्ट्रातील सर्व शासकीय व अभिमत वैद्यकीय महाविद्यालये आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून 14499 ही विनामूल्य मानसिक आरोग्य विषयक ‘संवाद’ हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे. या हेल्पलाईनमध्ये तज्ञ मनुष्यबळामार्फत मानसिक आरोग्यविषयी विद्यार्थ्यांचे समुपदेशन तसेच उपचार करण्यात येणार, असे त्यांनी म्हटले आहे.

▪️ आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आपला नंबर Hide करण्याचे ऑप्शन लवकरच येणार अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅप कमिटीने दिली आहे.

▪️ महाराष्ट्र सरकारमध्ये दोन उपमुख्यमंत्रिपदाची नियुक्ती केल्यानंतर आता सातारा जिल्ह्यातील सोनापूर या गावाने गावच्या विकासासाठी दोन उपसरपंच हवेत, असा ठराव मासिक सभेत करून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

▪️ आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं फेटाळून लावला – वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन मंजूर व्हावी अशी मागणी त्यांनी या जामीन अर्जातून केली होती.

▪️ सेन्सॉर बोर्डाने OMG 2 चित्रपटाचे रिलीज तात्पुरते थांबवले आहे कारण सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट रिव्ह्यू कमिटीकडे पाठवला आहे – आदिपुरुष चित्रपटाचा वाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे.

▪️ टोमॅटोच्या किंमती बाजारात २०० रुपये प्रति किलो रुपयांवर पोहोचल्याने ग्राहकांना मोठा फटका बसत आहे. यामुळे केंद्र सरकारने काल बुधवारी नाफेड आणि राष्ट्रीय ग्राहक सहकारी महासंघ यांना – आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून ग्राहक केंद्रांवर कमी दराने टोमॅटोची विक्री केली जाणार आहे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.

▪️ जवान चित्रपटाच्या पोस्टरनं वेधलं लक्ष; हातात बंदुक आणि डोळ्यावर गॉगल, शाहरुखचा खतरनाक लूक होतोय व्हायरल

▪️ पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; भारतीय हवामान खात्याचा अंदाज.

▪️ एका ऐतिहासिक उड्डाणासाठी इस्रो सज्ज; चांद्रयान-3 चं श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन दुपारी 2.35 मिनिटांनी प्रक्षेपण होणार.

▪️ एकनाथ शिंदेंचा गुलाम म्हणून काम करेन, मंत्रिपदाच्या निर्णयाबाबत 18 तारखेला निर्णय : बच्चू कडू.

▪️ शेतकरी नेत्यांना वगळून राज्य सरकारकडून ऊस दर नियंत्रण समिती स्थापन; राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, रघुनाथ पाटील यांना डच्चू!

▪️ आमरण उपोषण करून आम्ही मेलो तरी दखल घेणार नाहीत, राजकारण या थराला कधीच गेलं नव्हतं; डॉ. भारत पाटणकरांची खंत.

▪️ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पॅरिसमध्ये जल्लोषात स्वागत, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घेणार भेट.

▪️ चीन आणि पाकिस्तानला भरणार धडकी! 26 राफेल-एम विमानं, 3 स्कॉर्पिन पाणबुड्या; भारताचा फ्रान्ससोबत 90 हजार कोटी रुपयांचा करार.

▪️ IND vs WI 1st Test : यशस्वी-रोहितची शतके, डोमिनिका कसोटीवर टीम इंडियाचे वर्चस्व; भारताकडे 162 धावांची आघाडी.

tc
x