गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आले होते. अशातच राज्यपालांनी राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती. मात्र आता भगतसिंह कोश्यारी यांची ही ईच्छा पूर्ण झाली आहे.
आता कोण होणार नवे राज्यपाल ?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजीनामा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे.
तर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांनी राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता.
राज्यपालांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर आज भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होणार
हे ही वाचा : Ramesh Bais महाराष्ट्राचे नवे राज्यपाल रमेश बैस कोण आहेत?