खासगी ट्रॅव्हल्सही तिकिटाबाबत प्रवाशांना खूशखबर देणार
उन्हापासून वाचण्यासाठी नागरिक वातानुकूलित प्रवासाला प्राधान्य देत असून एसटीच्या शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही या सेवांमध्ये सवलत मिळत असल्याने प्रवाशांचे एसटी सेवेला प्राधान्य आहे.
उन्हाळी गर्दीच्या हंगामात प्रवाशांचा रस्ते प्रवास किफायतशीर होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने महिला सन्मान योजनेतंर्गत एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिल्यावर खासगी ट्रॅव्हल्सचे धाबे दणाणले आहेत.
यामुळे खासगी ट्रॅव्हल्स चालकांनीही महिलांसाठी बस भाडे कमी आकारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. खासगी ट्रॅव्हल्स वाल्यांनी हा निर्णय घेतला आहे.
उन्हाळ्याच्या सुट्या मध्ये मुले फिरण्यासाठी, गावाला जातात त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स भाडे कमी करण्याचे निर्णय घेतला
उन्हाच्या तडाक्यापासून वाचण्यासाठी नागरिक वातानुकूलित प्रवासाला प्राधान्य देत आहे.
एसटीच्या शिवनेरी, अश्वमेध, शिवशाही या वातानुकूलित सेवांमध्ये सवलत मिळत असल्याने प्रवाशांचे एसटी सेवेला प्राधान्य आहे.
चालक, एजंट, मालक यांच्या बैठका सुरू
एसटी स्थानक, आगारांमध्ये प्रचंड होणारी गर्दी पाहता खासगी ट्रॅव्हल्स मालक-चालकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. अनेक खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी आपल्या चालक, क्लिनरसह विविध ठिकाणी असलेल्या तिकीट बुकिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कॉन्फरन्स कॉल सुरू केला आहे. मोठ्या ट्रॅव्हल मॅनेजरकडून बैठका घेण्यात येत आहेत.
गाड्या स्वच्छ, सुस्थितीत ठेवा
गर्दीच्या हंगामात प्रवासी खासगीकडे वळता ठेवण्यासाठी गाड्या स्वच्छ, टापटीप आणि सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना देण्यात चालकांना देण्यात आलेल्या आहेत.
बस वेळेवर सोडाव्यात, प्रवाशांशी सौजन्याने वागावे असेही सांगण्यात आले. आवश्यक तिथे बस भाडे कमी करावे, अशा सूचना असल्याचे खासगी बससाठी तिकीट आरक्षित करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
५० टक्के सवलत पहा
गडचिरोली-चंद्रपूर ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून पाडव्याच्या मुहूर्तावर बसभाडे कमी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. प्रवासी गर्दी हंगामात भरघोस कमाई करण्यासाठी लक्झरी बस असोसिएशन वाशिम आणि अकोला यांनी महिलांच्या प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना याची माहिती मिळावी यासाठी समाजमाध्यमांवरून याचा प्रसार करण्यात येत आहे.
स्पर्धा वडाप, मॅक्सी कॅबबरोबर
एसटी भाड्यातील ५० टक्के सवलतीमुळे वडाप, मॅक्सिकॅब, काळीपिवळी जीप यांना आव्हान मिळणार आहे. मुंबईतून धावणाऱ्या खासगी बसच्या प्रवाशांवर याचा परिणाम होणार नाही.
मुंबई-पुणे महामार्गाचा विचार केला तर खासगी बसचा दर सोमवार ते शुक्रवार ३५० आणि सुट्टीच्या दिवशी ४५० असतो. शिवनेरीचा दर पाचशेहून अधिक आहे, यामुळे आम्ही आधीच कमी दरात सेवा देतो, अशी भूमिका मुंबई बस मालक संघटनेकडून मांडण्यात आलेली आहे
भरघोस प्रतिसाद
एसटीतील सर्व बसमध्ये १७ मार्चपासून महिलांना ५० टक्के सवलतीची योजना लागू झाली.
१७ ते २० मार्च या कालावधीत राज्यात ३९ लाख ४७ हजार ८९ महिला प्रवाशांनी प्रवास केला. या वाहतुकीतून महामंडळाने १० कोटी ४६ लाख २८ हजारांची कमाई केली आहे.
योजनेची प्रतिपूर्ती सरकारकडून महामंडळाला देण्यात येणार असल्याने तिजोरीत एकूण २० कोटींहून अधिकची भर पडणार आहे.
प्रवाशांना याची माहिती मिळावी यासाठी समाजमाध्यमांवरून याचा प्रसार करण्यात येत आहे.