Breaking News : पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीने रद्द केली असून तिला पुढील परीक्षांना बसण्यास मनाई करण्यात आली आहे.
गेल्या महिनाभरापासून चर्चेत असलेली पूजा खेडकरची उमेदवारी अखेर यूपीएससीने रद्द केली आहे. आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि नंतर कागदपत्रांमध्ये कथित अनियमितता आढळून आल्यानंतर पूजा खेडकरची उमेदवारी यूपीएससीने रद्द केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर ही यूपीएससीतर्फे घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेला बसू शकणार नसल्याचेही यूपीएससीने स्पष्ट केले आहे.
Breaking News : पूजा खेडकरसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. एकीकडे यूपीएससीने तिच्यावर ही कारवाई केली आहे, तर दुसरीकडे पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही.
पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांना UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने दिलेली तात्पुरती उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच, त्यांना UPSC ने सांगितले आहे की ते भविष्यात कधीही UPSC द्वारे घेतलेल्या कोणत्याही परीक्षेत बसू शकणार नाहीत’, ANI पोस्टने म्हटले आहे.
हेही वाचा : प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
हेही वाचा : ‘उपवास’ करणे फायदेशीर
हेही वाचा : घराचं स्वप्न पाहाणाऱ्यासाठी खूशखबर! 3 कोटी घरे असा करा अर्ज