Breaking News: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 24 जुलै 2023

● कोकण, विदर्भात पुढचे पाच दिवस पावसाचे; तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा.

● राज्यात पावसाचा कहर; पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क.

🤔 १२ कोटींची लॉटरी लागताच ‘तो’ बायकोला विसरला
https://davandi.in/2023/02/16/१२-कोटींची-लॉटरी-लागताच/

● अमित ठाकरेंची गाडी टोलनाक्यावर अडवल्याने कार्यकर्त्यांकडून तोडफोड; ‘प्रेमापोटी राग अनावर झाला’, नांदगावकर यांची प्रतिक्रिया.

● साहेबांमुळे 65 टोलनाके बंद झाले, माझ्यामुळे आता अजून एकाची भर पडली’; समृद्धी महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया.

▪️ रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट! पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक स्थानकांचा समावेश

📙 राशन कार्ड धारकांना खुशखबर धान्य ऐवजी मिळणार प्रति माणूस 9 हजार रुपये.
https://davandi.in/2023/02/16/ration-card-राशन-कार्ड-धारकांना-खुश/

▪️ शोधकार्य थांबवलं, अजूनही 57 जण बेपत्ता; उदय सामंत यांची माहिती

▪️ हिंसाचार रोखण्यासाठी अशी मंदिरं बंद करणं योग्य ठरेल, मद्रास उच्च न्यायालयाचे खडेबोल

▪️ पुणे शहराजवळ असलेल्या देशातील पहिल्या खासगी हिल स्टेशनच्या विक्रीस मंजुरी

▪️ ‘बॅनरबाजी अन् पार्टी देऊन निवडणूक जिंकता येत नाही’; नितीन गडकरींचं विधान

▪️ राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : कृषिमंत्री धनंजय मुंडे

▪️ टोलनाका फोडणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी

▪️ एसटीच्या कॅशलेस प्रवासाला सुरूवात! काही विभागात अँड्रॉइड तिकीट मशिन दाखल

● नागपुरातील व्यापाऱ्याला ऑनलाईन गेमच्या माध्यमातून 58 कोटींचा गंडा; आरोपीच्या घरातून 18 कोटींची रोकड, 15 किलो सोनं जप्त.

● मणिपूर हिंसाचार प्रकरणात सहाव्या आरोपीला अटक; अन्य आरोपींचा शोध सुरू.

● इर्शाळवाडीत घडलेल्या दुर्घटनेचं बचाव कार्य आजपासून थांबवण्यात येणार; दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झालाय तर 57 जण अद्याप बेपत्ता आहेत. आतापर्यंत 143 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश.

● चिराग शेट्टी आणि सात्विक आणि साईराज यांनी इतिहास रचला, नंबर एक जोडीला हरवत कोरिया ओपन स्पर्धेवर आपलं नाव कोरल.

● पोर्ट ऑफ स्पेन कसोटी रंगतदार स्थितीत, वेस्ट इंडिज पराभवाच्या छायेत, भारताकडे 289 धावांची आघाडी; चौथ्या दिवसाखेर वेस्ट इंडिजच्या 2 बाद 76 धावा.

● Asia Emerging Cup 2023 : भारताच्या युवा ब्रिगेडचे स्वप्न अपुरे; फायनल मध्ये पाकिस्तान अ संघाने भारताच्या युवा ब्रिगेडचा 128 धावांनी केला दारुण पराभव.

▪️ पुणे शहराजवळील पश्चिम घाटामध्ये बांधलेले ‘लवासा’ हे खाजगी हिल स्टेशन विकले गेले आहे. दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रिया सुरू केल्यानंतर सुमारे 5 वर्षांनी, राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणने त्यास मान्यता दिली आहे.

▪️ पुण्याच्या डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चरने ‘लवासा’ या सिटीला 1,814 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. NCLT ने 25 पानांचा आदेश जारी करत 1,814 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ही योजना मंजूर केली.

▪️अनिल अंबानींच्या रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून पाच विमानतळे परत घेणार, अशी माहिती उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली आहे.

▪️ राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून चिपळुणातील नागरिकांना महापुराच्या संदर्भातील माहितीचे संदेश मोबाईलवर पाठवण्यास सुरवात झाली आहे.

▪️ त्यामुळे चिपळुणात पूर कधी येणार, शहरात पाणी कधी भरणार याची माहिती आता मेसेजद्वारे उपलब्ध होऊ लागली आहे, दरम्यान हि यंत्रणा लवकरच संपूर्ण राज्यात लागू करण्यात येईल, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले आहे.

▪️ भारतातील G20 नेत्यांच्या बैठका दिल्लीतील प्रगती मैदानावर पुनर्विकसित आयटीपीओ कॉम्प्लेक्समध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 26 जुलै रोजी या कॉम्प्लेक्सचे उद्घाटन होणार आहे.

▪️ देशातील सर्वात मोठ्या खाद्यतेल कंपन्यांपैकी एक असलेल्या अदानी विल्मारने 22 जुलैला कंपनीच्या ‘फॉर्च्युन’ ब्रँड अंतर्गत बनावट खाद्यतेल विकणाऱ्या B2B प्लॅटफॉर्मविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.

▪️ श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीमध्ये त्यांनी श्रीलंकेमध्ये यूपीआयला मंजूरी देण्याच्या करार केला आहे. हा करार मान्य झाल्यास श्रीलंकेमध्येही यूपीआय वापरता येणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👩‍💻 तुमच्या व्यवसायाची जाहिरात करा – लाखो लोकांच्या WhatsApp वर! संपर्क 👉 – 9975167791
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

tc
x