Video: बंडानंतरची पहिली मंत्रिमंडळ बैठक, शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे ‘हे’ 8 महत्त्वाचे निर्णय राष्ट्रवादीतील बंडानंतर मंगळवारी (4 जुलै) शिंदे-फडणवीस-पवार सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आठ महत्त्वाचे निर्णय घेतले.
शिंदे गटाचे आमदार अनेक दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची मागणी करत होते. मात्र, त्यांचे स्वप्न पूर्ण होण्याआधीच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना शपथ दिल्याने राष्ट्रवादीत फूट निर्माण झाली. या सत्तापालटानंतर पहिल्यांदाच शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी (4 जुलै) झाली.
यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 8 महत्त्वाचे निर्णय घेतले. राज्याच्या ऊर्जा विभागाचे हरित हायड्रोजन धोरण जाहीर करण्यात आले. यानंतर असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यामुळे अक्षय ऊर्जा प्रकल्पांना मोठी चालना मिळेल.
2. मराठा, कुणबी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाता यावे यासाठी नियोजन विभागाने सयाजीराव गायकवाड – सारथी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली. यामुळे दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळणार आहे.
3. जलसंपदा विभागाने दिंडोरी तालुक्यातील चिमणपाडा आणि त्र्यंबक तालुक्यातील कळमुस्ते येथील वळवण्याच्या आराखड्याला मंजुरी दिली आहे.
4. मंत्रिमंडळ बैठकीत एम.शिवराज फाईन आर्ट लिथो वर्क्सच्या कर्मचाऱ्यांना उद्योग विभाग, नागपूर येथे शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
6. महसूल विभागाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, गेळे व चौकुळ येथील मंजूर गावकर जमिनीबाबत निर्णय घेण्यात आला.
7. कृषी विभाग, नागपूर कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
8. पदुम विभागातील मत्स्यबीज उत्पादन आणि मत्स्यबीज संवर्धन केंद्रांचा भाडेपट्टा कालावधी २५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आला आहे.
व्हिडिओ पहा:
राज्य सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मंत्रिमंडळ बैठकीत ‘प्रथम वर्ष सुराज्याचे’ या निर्णय पुस्तिकेचे प्रकाशन, वर्षभरातील महत्त्वाच्या निर्णयांचा आढावा आणि महासंचालनालयाच्या ‘लोकराज्य’ मासिकाचे प्रकाशन माहिती आणि जनसंपर्क.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे प्रकाशन करण्यात आले.
दरम्यान, मंत्रालयात गेल्यावर अजित पवारांनी ट्वीट करत म्हटलं, “आज मंत्रालयात छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब, महात्मा जोतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केलं.”
This post was last modified on %s = human-readable time difference 11:49 am