Blood purifiers :
हिरव्या पालेभाज्या
पालकासारख्या हिरव्या पालेभाज्या सॅलड तयार करण्यासाठी फायदेशीर आहेत. पण त्याचबरोबर त्यातील लोह या घटकामुळे शरीरातील रक्ताची उणीव दूर होते.
बेरी
रासबेरी, ब्ल्यूबेरी व स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असतात; जे रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारतात, रक्तदाब कमी करतात.
मासे
सॅल्मन, मॅकरेल व सार्डिन हे मासे हृदयाच्या आरोग्यासाठीही ते तितकेच फायदेशीर असतात. ओमेगा -३ फॅटी अॅसिडने समृद्ध असलेले हे मासे जळजळ आणि शरीरास हानिकारक असलेले फॅट्स कमी करतात.
सुका मेवा आणि बिया
बदाम, चिया सीड्स व जवस हे पदार्थ फक्त स्नॅकसाठीच उपयुक्त नाहीत, तर ते पौष्टिक पदार्थसुद्धा आहेत; जे शरीरास ऊर्जापुरवठाही देतात. त्यात निरोगी फॅट्स, फायबर व प्रोटीन्स असतात; जे कोलेस्ट्रॉल आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.
बीट
बीटमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते; ज्याचे शरीरात गेल्यावर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होते. नायट्रिक ऑक्साइड हा घटक रक्तवाहिन्यांना आराम देतो आणि त्यामुळे रक्तप्रवाह सुधारून, रक्तदाब कमी होतो.
हेही वाचा : वाहनधारकांनो सावधान! FASTag नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल; NHAI चा नवा नियम
हेही वाचा :मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेत कोणते तरुण पात्र ठरणार?