X

BLOOD DONATE : रक्तदान कोणी करावे आणि कोणी करू नये ? – वाचा रक्तदानाबद्दल तज्ज्ञ काय सांगतात…

BLOOD DONATE

BLOOD DONATE : रक्तदान सुरक्षित आहे का ?

▪️ रक्तदान करणे पूर्णपणे सुरक्षित आहे.
▪️ १८ ते ६० वर्षापर्यंतचे व्यक्ती रक्तदान करू शकतात.
▪️ तसेच रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचे वजन 45 किलोपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

एखादी व्यक्ती किती वेळा आणि किती काळाने रक्तदान करू शकते ?

▪️ रक्तदान केल्यानंतर साधारण 3 महिन्यांनंतर तुम्ही पुन्हा रक्तदान करू शकता.
▪️ कारण तीन महिन्यांत शरीरामध्ये रक्तातील लाल पेशी पुन्हा तयार होतात.

रक्तदान कोण करू शकत नाही ?

▪️ ज्या व्यक्तीला रक्तदाबाचा त्रास आहे तो व्यक्ती रक्तदान करू शकत नाही.
▪️ एखाद्या व्यक्तीला तीव्र अनियंत्रित मधुमेह असेल, तर अशी व्यक्तीदेखील रक्तदान करू शकत नाही.
▪️ ज्या व्यक्तीला हिमोग्लोबिनचा त्रास आहे अशी व्यक्ती सुद्धा रक्तदान करू शकत नाही.
▪️ रक्तदान करण्यासाठी हिमोग्लोबिनची पातळी 12.5g/dL पेक्षा जास्त असली पाहिजे.

रक्तदान करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ?

▪️ रक्तदान करायला जाताना कधीही उपाशीपोटी जाऊ नये.
▪️ तसेच रक्तदान करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने धूम्रपान किंवा मद्यपान करू नये.
▪️ याचबरोबर रक्तदान करायला जाताना सैल कपडे घाला.

रक्तदान केल्यानंतर कोणती काळजी घ्यावी ?

▪️ रक्तदान केल्यानंतर काही वेळ तेथेच थांबावे, कारण रक्तदान केल्यानंतर थकवा जाणवतो किंवा चक्कर येतात.
▪️ रक्तदानाच्या दिवशी कोणतेही काम करू नये. पूर्णपणे आराम करावा.
▪️ याशिवाय रक्तदान केल्यावर मैदानी खेळ टाळावेत.

हेही वाचा :  शिक्षक व्हायचंय? ‘टीईटी’चा फॉर्म भरा…; शेवटची मुदत… 👇येथे पहा

हेही वाचा : तीर्थ दर्शन योजनेसाठी शासनाचे आवाहन..‼️

हेही वाचा : नोकरीच्या नवीन संधी कशा मिळतात

This post was last modified on %s = human-readable time difference 10:54 am

Categories: आरोग्य
Davandi: