Bhandhkam kamgar nondni yojna 2024 : बांधकाम कामगारांसाठी सरकारी योजनांचा लाभ घ्या: नोंदणी कशी करावी?

Bhandhkam kamgar nondni yojna 2024 : बांधकाम कामगार योजनेद्वारे 32 प्रकारच्या योजनेचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जातो. योजनेत भांड्यांचा सेट, पेटी, मुलांच्या लग्नासाठी खर्च तसेच इतर भरपूर योजना या बांधकाम कामगारांना मिळतात. योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना नोंदणी करणे गरजेचे आहे.

नोंदणी पात्रता निकष.


▪️18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार पात्र

▪️ मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार पात्र असतील.

आवश्यक कागदपत्रे बघा.


▪️ वयाबाबतचा पुरावा (आधारकार्ड / पॅनकार्ड / ड्रायविंग लायसन्स / जन्म दाखला / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र) कोणतेही एक

▪️मागील वर्षात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (मालक, ग्रामसेवक, म.न.पा, न.पा. ने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र) यापैकी एक

▪️ रहिवासी पुरावा (आधारकार्ड / राशन कार्ड/ ड्रायविंग लायसन्स/ मागील महिन्याचे वीजबिल / ग्रामपंचायत दाखला) कोणतेही एक

▪️ फोटो आयडी पुरावा आधारकार्ड/ पॅनकार्ड/ ड्रायविंग लायसन्स / मतदान कार्ड)

▪️बँक पासबुक ची झेरॉक्स

▪️पासपोर्ट आकारातील 3 फोटो

नोंदणी करीता फी


▪️ नोंदणी फी 25/- रुपये (एकदाच) व मासिक वर्गणी 1/- रुपये प्रमाणे 5 वर्षाकरिता 60/- रुपये जमा करणे आवश्यक आहे.

बांधकाम कामगार योजना ऑनलाइन अर्ज करा :


▪️ योजनेची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट mahabocw.in वर जा त्यानंतर बांधकाम कामगारः नोंदणी या लिंक वर क्लिक करा.

फॉर्म डाऊनलोड करा

▪️ आता ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी करायची आहे त्यांचा आधार नंबर आणि चालू मोबाइल नंबर भरून Proceed to Form या बटनावर क्लिक करा.

▪️अर्ज मध्ये तुम्हाला वैयक्तिक माहिती, आधार कार्ड नुसार पत्ता, कौटुंबिक माहिती, कामकाजाची माहिती भरून आणि आवश्यक दस्तावेज अपलोड करून फॉर्म Submit करायचा आहे.

▪️ तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या विभागात जाऊन देखील तुम्ही अर्ज करू शकता.

कृपया ही महत्वाची माहिती इतरांना देखील शेअर करा..

हेही वाचा : लाडकी बहिणींसाठी दसऱ्याची भेट! लवकरच 3000 रुपये आता तुमच्या खात्यात


हेही वाचा : नवरात्री: देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावे आणि काय नाही


हेही वाचा : लाडक्या बहिणींना अन्याय! पैसे कापणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी


हेही वाचा : ई केवायसी करा, अन्यथा रेशन कार्ड बंद, जाणून घ्या कशी करायची ई केवायसी?

tc
x