Best relationship advice : वैवाहिक आयुष्यात आनंदी कसे रहायचे? ८२ वर्षीय आजोबांचा तरुण पिढीला अमूल्य सल्ला

Best relationship advice : ८२ वर्षांचा अनुभव असलेले आजोबा आपल्या नातवंडांना आणि तरुण पिढीला वैवाहिक आयुष्यात आनंदी कसं राहायचं याबद्दल एक अमूल्य सल्ला देतात. त्यांचा सल्ला अगदी सोपा आहे: “एकमेकांशी दयाळू आणि आदराने वागा.”
व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

Best relationship advice : thinkwithabhay या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “८२ वर्षीय वृद्ध व्यक्तीने खेद मुक्त आयुष्य जगण्यासाठी आणि नातेसंबधाविषयी एक मोलाचा सल्ला दिला आहे”


या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आजोबांच्या डोळ्यांकडे पाहा” तर एका युजरने लिहिलेय, “या पिढीला खऱ्या प्रेमाचा अर्थ माहिती आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “ही जुनी पिढी नाही तर अनुभवी पिढी आहे. आपण या पासून शिकायला पाहिजे.”
व्हिडिओ पाहण्यासाठी >>> येथे क्लिक करा >>>

tc
x