Bajaj CNG Bike : दिमाखदार ,ऐटबाज बजाज फ्रीडम सी एन जी बाईक लाॅन्च_
भारतीय कंपनी
◆ बजाज ऑटोने इतिहास रचत जगातली पहिली सीएनजी बाईक लॉन्च केली.
◆ बजाजने एकूण 3 मॉडेल लाँच केले आहेत. तिन्ही मॉडेल ग्राहकाच्या बजेटमध्ये बसणार आहेत. यामध्ये सर्वात कमी मॉडेलची किंमत 95 हजार रुपये आहे.
◆ गेल्या काही महिन्यांपासून ज्या बाइकची चर्चा सुरू होती अखेरीस ती बाईक लॉन्च झाली.
◆ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या गाडीचं लाँचिंग करण्यात आलं आहे.
◆ बजाज फ्रीडम सीएनजी असं या बाइकचं नाव आहे. या बाइकची किंमत 95,000 असणार आहे.
◆ एकूण अशी 3 मॉडेल आहे. यामध्ये फ्रीडम 125 NG04, फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडी, फ्रीडम 125 NG04 ड्रम अशी मॉडेल आहे.
◆ फ्रीडम 125 NG04 ची किंमतही 1 लाख 10 हजार असणार आहे. तर फ्रीडम 125 NG04 ड्रम एलईडी ची किंमत 1 लाख 5 हजार असणार आहे. तर फ्रीडम 125 NG04 ड्रमची किंमत 95 हजार असणार आहे.
◆ या बाइकमध्ये पाच लिटर पेट्रोल साठवण्याची क्षमता असलेली एक लहान फ्युएल टँक आहे. बाइकच्या व्हीलबेसवर एक लांब सीट आहे आणि त्याखाली सीएनजी टँक बसवण्यात आली आहे.
◆ सीएनजी आणि पेट्रोल इंधनाची एकत्रित क्षमता असल्यामुळे ही गाडी पारंपरिक 125 सीसी बाईकप्रमाणे रेंज देते.
◆ स्टायलिश बेली पॅन, स्प्लिट 5-स्पोक डिझाइन अलॉय व्हील्स, मागच्या सीटवरच्या प्रवाशासाठी फंक्शनल ग्रॅब रेल, रिब्ड सीट, ट्रॅडिशनल आरएसयू टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स, रिअर मोनो-शॉक सेटअप, टायर हगर आणि मेगा कलर रेंज यांचा समावेश आहे.
ही बाईक ग्राहकांच्या किती पसंतीस उतरेल हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
हेही वाचा : – भरतीसाठी मोफत प्रशिक्षण येथे वाचा
हेही वाचा : – लागू झाले हे मोठे बदल तुमचा साठी काय पहा